Mass Marriage Ceremony in nimgaon
sakal
अर्धापूर (जिल्हा नांदेड) - आख्खा गावात लगीन घाई... प्रत्येकाच्या घरी पाहुणे मंडळींची रेलचेल, गावाला यात्रेचे स्वरूप.... प्रत्येकाला लग्न मंडपात जाण्याची घाई.., पवित्र मंत्रोच्चार.. गावात जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर वाहनांच्या रांगा.,.. लोकप्रतिनिधी मांदियाळी.., हे चित्र होते. निमगाव (ता अर्धापूर) होते. निमित्त होते ते आदिवासी कोळी महादेव समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सामुहिक विवाह सोहळ्याचे. हजारो व-हाडी मंडळींच्या उपस्थितीत २८ व्या विवाह सोहळ्यात सात जोडपे विवाहाच्या पवित्र बंधनात बांधले गेले आहेत.