विहीरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू

गजानन उदावंत 
Wednesday, 23 December 2020

ही घटना ता. 22 रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली

जाफराबाद (जि.जालना) : बोरगांव बु. (ता.जाफराबाद) येथील तरुण शेतकरी समाधान मैनाजी जोशी वय 21 वर्षे हे विहीरीतील विदयुत मोटारीचे काम करण्यासाठी विहीरीत उतरताना घसरुण पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला.

ही घटना ता. 22 रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. बोरगांव बु. येथील समाधान जोशी हे स्वत:च्या शेतातील विहीरीतील विदयुत मोटारीचा पंप दुरुस्तीसाठी विहीरीत खाली उतरताना विहीरीत पडल्याने पाण्यात बुडून मृत्यु झाला आहे.

वाहन दरीत कोसळून लातूर जिल्ह्यातील जवानाला वीरमरण, सियाचीन सीमेवरील घटना

या घटनेची माहीती पोलिसांना मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार एस.सी.खिल्लारे यांनी घटनेची नोंद करुन पंचनामा केला. तसेच ग्रामीण रुग्णालय जाफराबाद येथे डाँ. डी. एन. पाटील, डाँ.विकास काशीकर यांनी ता.23 रोजी सकाळी अकरा वाजता शवविच्छेदन केले.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: well accident in Jalna farmer death on 22 december