esakal | बाहेरगावाहून परतलेल्यांची माहिती घ्यायला गेले अन् घरात आढळली हातभट्टी दारू 

बोलून बातमी शोधा

gavthi

कुरुंदा पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या चोंढी बहिरोबा तांड्यावर सोमवारी (ता.२३) पोलिसांनी छापा मारून २२५ लिटर मोहफुलाचे सडके रसायन व २१ लिटर दारू असे एकूण सहा हजार ६०० रूपये किंमतीचा माल जप्त करून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

बाहेरगावाहून परतलेल्यांची माहिती घ्यायला गेले अन् घरात आढळली हातभट्टी दारू 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कुरुंदा ः कुरुंदा पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या चोंढी बहिरोबा तांड्यावर सोमवारी (ता.२३) पोलिसांनी छापा मारून २२५ लिटर मोहफुलाचे सडके रसायन व २१ लिटर दारू असे एकूण सहा हजार ६०० रूपये किंमतीचा माल जप्त करून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.


वसमत तालुक्‍यातील चोंढी बहिरोबा तांड्यावर सोमवारी सहायक पोलिस निरिक्षक सुनिल गोपीनवार, पोलिस उपनिरीक्षक सविता बोधनकर, गजानन भोपे, बालाजी जोगदंड, रामदास ग्यादलवाड, मधुकर आडे, विकास राठोड, श्री.मस्‍के हे ‘कोरोना’ विषाणूनिमित्त मुंबई, पुणे, येथून गावी परत आलेल्या लोकांची माहिती काढण्यासाठी आले असता येथे गावठी हातभट्टीची दारू अवैधरित्या विक्री करीत आहेत, अशी माहिती मिळाल्यावरून चौघांच्या घरात छापा टाकला. 

चौंघावर गुन्हा दाखल
गावठी हातभट्टीची २२५ लिटर मोहफुलाचे सडके रसायन व हातभट्टीची २१ लिटर दारू असे एकूण सहा हजार ६०० रूपयांचा माल येथे मिळून आला. सदर प्रकरणी पोलिस कर्मचारी बालाजी जोगदंड यांच्या फिर्यादीवरून चौंघावर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलिस निरीक्षक सुनिल गोपीनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन भोपे करीत आहेत. 

हेही वाचा - कोरोना’च्या भीतीने नांदापूर गावची वेस युवकांनी केली बंद

पोलिसाच्या हाताला झटका देऊन पळालेला आरोपी जेरबंद
हट्टा ः वसमत तालुक्‍यातील हट्टा पोलिस ठाण्यात घरफोडी प्रकरणातील अटक असलेला आरोपी रविवारी (ता.२२) सकाळी ४.४० वाजता लघुशंकेसाठी पोलिस घेऊन जात असताना त्‍याने पोलिसाच्या हाताला झटका देऊन पळून गेला. त्‍याला स्‍थानिक गुन्हे शाखा व हट्टा पोलिसांनी परभणी जिल्‍ह्यातील मानगाव येथील एका शेतात अटक केली.हट्टा परिसरातील घरफोडी प्रकरणातील ईश्चर पवार (रा. बिंबी, ता. लोणार, जि. बुलडाणा) याला स्‍थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्‍याच्या घरून अटक करून हट्टा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. हा आरोपी पोलिस कोठडीत आहे. रविवारी सकाळी ४.४० वाजता त्‍याला लघुशंकेसाठी पोलिस घेऊन जात असताना त्‍याने पोलिसांच्या हाताला झटक देऊन तो फरार झाला. त्‍यानंतर पोलिसांनी त्‍याचा शोध सुरू केला. यात स्‍थानिक गुन्हे शाखेचे पथक व हट्टा पोलिसांनी त्‍याची शोध मोहीम सुरू केली.

हेही वाचा - दवंडीच्या माध्यमातून गावांमध्ये ‘कोरोना’ची जनजागृती

तीन किलोमीटर पोलिस कर्मचारी धावले आरोपीसाठी
फरार झालेला आरोपी परभणी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांमार्फत मिळाली. त्‍यानंतर स्‍थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, हट्टा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गजानन मोरे, आकाश सरोटे, राजेश ठाकूर, गणेश लेकुळे, इम्रान कादरी, सचिन शिंदे, बालाजी जाधव, अरविंद गजभार आदींनी पूर्णा नदीपात्राच्या पलीकडील बाजूस परभणी जिल्‍ह्यातील मानगाव येथील एका शेतात कापसाच्या पिकात लपून बसल्याचे लपून बसल्याचे नईम कादरी यांना दिसला. आरोपी ईश्वर याला पोलिस येत असल्याचे लक्षात येतात त्‍याने पळ काढला. दरम्‍यान, रनर व फुटबॉल खेळाडू असलेले पोलिस कर्मचारी नईम कादरी यांनी त्‍याचा पाठलाग सुरू केला. तीन किलोमीटर अंतरावर गेल्यावर त्‍याला श्री. कादरी यांनी पकडले. सात ते आठ तास आरोपीचा शोध घेत स्‍थानिक गुन्हे शाखा व हट्टा पोलिसांनी एकत्र येत बावीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. 

जिल्‍हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्‍लंघनप्रकरणी गुन्हा
औंढा नागनाथ ः औंढा शहरात हिंगोली ते औंढा रोडवर एका हॉटेलसमोर विनानंबरच्या एका ट्रॅक्‍टर चालकाने ट्रॅक्‍टरवर टेपची गाणी मोठ्या आवाजात लावून नागरिकांना त्रास होईल, अशारितीने वाजवून जिल्‍हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्‍लंघन केल्याप्रकरणी एकावर रविवारी (ता.२३) गुन्हा दाखल झाला आहे. औंढा पोलिस ठाण्यांतर्गत शहरातून जाणाऱ्या हिंगोली ते औंढा रस्‍त्‍यावर वाशीमकर यांच्या साईनाथ हॉटेलसमोर रविवारी सकाळी दहा वाजता सारंग टोंपे (रा.सुरवाडी ता. औंढा) याने त्‍याच्या ताब्यातील विनानंबरच्या ट्रॅक्‍टरवर टेपची गाणी मोठ्या आवाजात लावून शहरात राहणाऱ्या लोकांना त्रास होईल, अशारितीने वाजवून जिल्‍हाधिकारी संदर्भाने दिलेल्या आदेशाचे उल्‍लंघन केले म्‍हणून कर्मचारी राजकुमार सुर्वे यांच्या फिर्यादीवरून औंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास ए. जी. पठाण हे करीत आहेत.