Deglur News : कामाच्या शोधात आलेल्या पश्चिम बंगालमधील युवकाचा खड्ड्यात पडून मृत्यू; देगलूर नवीन बसस्थानकातील घटना
हॉटेल कामासाठी पश्चिम बंगालमधून आलेल्या एका युवक कामगाराचा खड्ड्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना देगलूर शहरातील नवीन बसस्थानकात घडली.
देगलूर - हॉटेल कामासाठी पश्चिम बंगालमधून आलेल्या एका युवक कामगाराचा खड्ड्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शहरातील नवीन बसस्थानकात गुरुवार ता. ९ रोजी रात्री उशिरा घडली.