बांगडी घालण्याचा काय मिळतो स्त्रियांना लाभ... वाचा

नवनाथ येवले
Tuesday, 17 March 2020

स्त्रिया पुरातन काळापासून हातामध्ये काकन किंवा बांगडी घालतात, पण या मागचे कारण काय?, पूर्वी राजे महाराजे यांच्या स्त्रिया किंवा महाराणी या सोन्याच्या व चांदीच्या बांगड्या घालत होत्या, त्याचे कारण काय? बांगडी हा मनगटात घालण्याचा अलंकार आहे.

नांदेड : स्त्रिया पुरातन काळापासून हातामध्ये काकन किंवा बांगडी घालतात, पण या मागचे कारण काय?, पूर्वी राजे महाराजे यांच्या स्त्रिया किंवा महाराणी या सोन्याच्या व चांदीच्या बांगड्या घालत होत्या, त्याचे कारण काय? बांगडी हा मनगटात घालण्याचा अलंकार आहे.

बांगडी सहसा काचेची असते आणि प्लॉस्टिकच्या बांगड्या सुद्धा बाजारांमध्ये मिळतात. लग्नावेळी वधूच्या हातात ज्या बांगड्या घालतात, त्यांना वज्रचुडा म्हणतात. हा सुद्धा लग्नामध्ये सौभाग्याचा अलंकार म्हणून वापरतात. तो चुडा हिरव्या किंवा पोपटी रंगाचा असतो. काही ठिकाणी तो लाल रंगाचा सुद्धा असतो. स्त्रियांच्या काही रोगांवर काचेच्या बांगड्यांचा चांगला उपयोग होतो. बांगड्या घातल्याने त्यांच्या चेहऱ्यावर तेज येते. दात दुखणे, रक्तदाब कमी-जास्त होणे यावर या बांगड्यांचा अनुकूल परिणाम होतो. या शिवाय बोबडेपणा, तोतरेपणावरही बांगड्याचा उपयोग होतो, असे मानले जाते. बांगड्या घातल्यामुळे स्त्रिया आकर्षक दिसतात, त्याचप्रमाणे त्या संस्कृत वाटतात व त्यामुळे त्यांची सुंदरता वाढते.

हेही वाचाकोरोनाबाबत ‘या’ शहरात अनेकांना गांभीर्यच नाही... ​
 

बांगडी करते महिलांना शक्ती देण्याचे काम
बांगडी हा एक अलंकार आहे की ज्यामुळे स्त्रिया सुंदर दिसतात. सध्याच्या काळात मात्र काही महिला बांगड्या घालत नाहीत. त्यामुळे मोठ्या शंकेने महिलांमध्ये कमजोरी आणि शारिरीक शक्तीचा अभाव दिसून येतोय. लवकर थकवा येऊन गंभीर आजार होत असल्याचेही समोर येत आहे. पूर्वीच्या काळातील महिलांना अशा समस्या नव्हत्या. पूर्वीच्या महिलांचे खाण-पाण तसेच त्यांचे नियम आणि संयम त्यांच्या निरोगी जीवनासाठी उपयुक्त ठरत होते. महिलांना शक्ती देण्याचे काम हे सोन्या चांदीचे दागिने करायचे, हातांची हाडे मजबूत करण्यास सोन्या चांदीच्या बांगड्या अत्यंत महत्वाच्या ठरतात. या बांगड्याच्या घर्षणामुळे हातामध्ये सोन्या चांदीचे गुण सामावले जातात.

बांगड्याच्या आवाजाने सकारात्मक उर्जा निर्माण होते
आयुर्वेदानुसार सोन्या चांदीचे भस्म हातांमध्ये बळ व शक्ती प्रदान करते. सोन्या चांदीच्या घर्षणामुळे शरिरात धातूचे तत्व निर्माण होत असत. याच कारणाने पूर्वी महिला दीर्घ आयुष्य जगत होत्या, त्यांचे आयुष्य जास्त होते. धार्मिक मान्यतेनुसार ज्या विवाहित महिला बांगड्या घालतात, त्यांच्या पतींचे वय वाढते, बांगड्यांच्या आवाजाने स्त्रियांच्या मनावर शुभ प्रभाव पडतो. म्हणून पूर्वी प्रत्येक स्त्रीच्या हातामध्ये बांगड्या असायच्या. आत्ताच्या परिस्थितीत बहूतांश महिलांच्या हातात बांगड्या नाहीत, ज्या घरामध्ये बांगड्यांचा आवाज होतो, त्या घरातील नकारात्मक ऊर्जाही बाहेर फेकली जाते आणि बांगड्यांच्या आवाजाने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

येथे क्लिक करा ‘या’ महापालिकेतील कचरा ठेकेदाराची समस्या वाढण्याची चिन्हे! ​

बांगडीची अख्यायीका -
ज्या ठिकाणी महिलांच्या हातातील बांगड्याचा आवाज राहतो, त्या ठिकाणी देवी देवतांची विशेष कृपा राहते. अशा घरामध्ये सुख, शांती, स्मृती राहते अशी अख्यायीका आहे. फक्त बांगड्या घातल्याने सकारात्मक फळे प्राप्त होऊ शकत नाहीत व नकारात्मकता बाहेर जाऊ शकत नाही. म्हणून पूर्वी स्त्रिया बांगड्या घालयच्या आता बांगड्याच्या ऐवजी अनेक वस्तू किंवा ब्रेसलेट इतर गोष्टी परिधान करतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What Benefits of Wearing a Bangle Women Read ...,Nanded News