‘या’ इमारतीत दडलंय काय?

goverment medical college and hospital get photo
goverment medical college and hospital get photo

नांदेड - शासकीय रुग्णालयात रुग्णास उपचारासाठी घेऊन येणारे रुग्णाचे सर्वच नातेवाईक हुशार असतील असे नाही. साहजीकच रुग्णासोबत आलेल्या नातेवाईकांना काहीच माहिती नसल्याने तिथे विचारणा करावी लागते. तरीही अनेकास परीपूर्ण माहिती मिळत नाही आणि गोळ्या, औषधे व इतर कागदपत्रांसाठी अनेक विभागात पायपीट करावी लागते. अशा वेळी रुग्णाचे नातेवाईक चुकुन जरी शासकीय रुग्णालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या विभागात शिरले तर त्यांना सुरक्षारक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. ऐकले नाही तर त्यांची दमदाटी अन धक्काबुक्की सहन करावी लागते.
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात अपघात विभाग, बाह्यरुग्ण विभाग, प्रशासकीय इमारत, सर्जरी विभाग, सिटी स्कॅन विभाग, एक्सरे विभाग, जळित विभाग असे कितीतरी स्वतंत्र विभाग आहेत. रुग्णाला घेऊन आलेल्या नातेवाईकांना चिठी काढण्यापासून ते संबंधीत रुग्णाचे केस पेपर काढणे, रक्त - लघवी तपासणी, सिटी स्कॅन, एक्सरे सारख्या अनेक चाचण्या घेण्यासाठी संबंधीत विभागात जावे लागते. अनेक विभाग एकमेकापासून अंतरावर आहेत. अशात जर नातेवाईकांना प्रशासकीय इमारतीच्या आतून जाण्याची वेळ आली तर, मात्र त्यांना सुरक्षा रक्षकांकडून दमदाटी केली जाते. या उपर जर त्या नातेवाईकांनी सुरक्षा रक्षकास भेदून पुढे जाण्याची हिंमत केलीच तर, त्यांना धक्काबुक्की करुन पुन्हा गेटच्या बाहेर केले जाते.

कॅन्टीन नेमकी कुणासाठी?
शासकीय रुग्णालयातील सर्वात मोठी कॅन्टीन याच विभागात आहे. त्यामुळे सर्जरी झालेल्या अनेक रुग्णास नाष्टा, जेवण, चहा- बिस्कीट किंवा ज्युस व इतर पदार्थ या कॅन्टीनमध्ये मिळतात. तेव्हा या कॅन्टीनमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांंची सारखी वर्दळ असते. परंतु काही दिवसापासून नातेवाईकांनाच या इमारतीमध्ये पाऊल ठेवण्यास मज्जाव करण्यात आल्याने नातेवाईकांना रुग्णालयाच्या गेट बाहेर जाऊन रुग्णासाठी लागणारे खाद्यपदार्थ अथवा चहा-बिस्कीट घेऊन यावे लागते. त्यामुळे रुग्णालयातील कॅन्टीन नेमकी कुणासाठी आहे असा सवाल उपस्थित होत आहे.

हेही वाचानांदेडच्या ‘या’ बँकेच्या शाखेचा कारभार जाणार महिलेच्या हाती

काय दडलय या प्रशासकीय इमारतीत
प्रशासकीय इमारतीमध्ये तळमजल्यावर वैद्यकीय अधिक्षक डॉ. वाय. एच. चव्हाण आणि वैद्यकीय उपाधीक्षक डॉ. प्रदीप बोडखे यांचा कक्ष आहे. याच कक्षाच्या बाजूस पूर्वी डॉ. श्री बोडखे यांचे कक्ष असलेल्या खोलीत सुरक्षा रक्षकाने बस्तान बसविले आहे. पहिल्या माळ्यावर प्रशिक्षित परिचारिका यांचे रुम आणि कार्यक्रम घेण्यासाठी स्वतंत्र हॉल आहे. या विभागातून पुढे गेल्यास शासकीय रक्तपेढी, प्रसूती विभाग, महात्मा फुले जन आरोग्य मित्र हे विभाग अगदी एकमेकास लागून आहेत. त्यामुळे अनेक जण प्रशासकीय इमारतीमधील या गेट मधून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र, त्यांना कितीही घाई असली तरी, त्यांना पुढे जाऊ दिले जात नाही. त्यांची अडवणूक होते. नेमके काय दडलय? असे या प्रशासकीय इमारतीमध्ये जिथे रुग्णांच्या नातेवाईकांची अडवणूक केली जाते आहे.

हे ही वाचलेच पाहिजे -सासरवडीत जावयाचा थयथयाट, म्हणाला तलाक.....

या ठिकाणाहून येतात रुग्ण
जिल्ह्यातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय असल्याने या ठिकाणी जिल्हाच नव्हे तर, आजूबाजूच्या हिंगोली, परभणी, लातूर, यवतमाळ जिल्ह्यासह शेजारच्या राज्यातील तेलंगणा, कर्नाटकच्या सीमावर्ती भागातून अनेक रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी दाखल होतात. त्यामुळे या ठिकाणी दररोज गर्दी असते. अशा वेळी रुग्णांच्या नातेवाईकांना माहिती होण्यासाठी सूचना फलक आणि जनजागृतीही करणे गरजेचे आहे. फक्त सुरक्षा रक्षकांकरवी दमदाटी करण्यात अर्थ नाही. रुग्णांच्या नातेवाईकांना मार्ग किंवा माहिती देण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ देखील असणे गरजेचे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com