वारंगा फाटा येथे गव्हाचा ट्रक पेटला

राजेश दारव्हेकर
Wednesday, 18 March 2020

ट्रक पलटी होऊन पेट घेतल्याची घटना घडली. या अपघातात जीवीत हानी झाली नसली तरी ट्रकची कॅबीन जळूनखाक झाली. उपस्थितांच्या मदतीने बाळापूर पोलिसांनी ही आग आटोक्यात आणली. 

वारंगा फाटा (जिल्हा हिंगोली) : हिंगोली ते नांदेड या राष्ट्रीय महामार्गावर वारंगाफाटा येथील भवानी मंदिरासमोर बुधवार (ता. १८) पहाटे ट्रक पलटी होऊन पेट घेतल्याची घटना घडली. या अपघातात जीवीत हानी झाली नसली तरी ट्रकची कॅबीन जळूनखाक झाली. उपस्थितांच्या मदतीने बाळापूर पोलिसांनी ही आग आटोक्यात आणली. 
  
याबाबत सविस्तर वृत्त असे की जळगाव जांबुत येथून गहू घेऊन निघालेला हैदराबादकडे जाणारा ट्रक (एमएच40- बीजी- 9363) हा घेऊन जात असताना वारंगा फाटा येथील भवानी मंदिरासमोरील राष्ट्रीय महामार्गावरील खड्डडा चुकवीत असताना ट्रक पलटी झाला. त्यानंतर ट्रक चालकाचे ट्रकवरील ताबा सुटला आणि ट्रक रस्त्याच्या कडेला पलटला. नंतर त्यातील बॅटरीचा स्पोट झाल्याने गव्हाने भरलेल्या ट्रकने पेट घेतला. 

हेही वाचाया’ शहरातील वाहतुकीची समस्या कशी सुटेल...? वाचा..

ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात

ही माहिती बाळापूर पोलिसाना समजताच सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी हुंडेकर, हवालदार शेख बाबर यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलालाची व्यवस्था कळमनुरी व नांदेडलाच असल्यामुळे वेळ लागणार हे ओळखून सपोनि रवी हुंडेकर व शेख बाबर यांनी येथील बापू वाटर प्लांट मालक पंडित पतंगे यांच्याकडून पाण्याने भरलेले जार मागवुन ग्रामस्थ संतोष कदम, प्रमोद कदम, लिंबाजी कदम, राजू खरोडे या ग्रामस्थांच्या मदतीने पाणी टाकून लागलेली आग आटोक्यात आणली. यामुळे ट्रक व गव्हाचे होणारे मोठे नुकसान टळले. याबाबत पोलिसांनी व ग्रामस्थाने दाखविलेल्या तत्परतेबद्दल समाजातून चांगल्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

येथे क्लिक करापुण्‍याहून आलेल्याच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांत भीती, ठेवले सुरक्षित अंतर

ट्रक चालकास मारहाण करून लुटले

नांदेड : धुराळा का उडवत आहेस म्हणून चक्क ट्रक चालकासह त्याच्या सहकाऱ्याला रस्त्यात अडवून बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर त्यांच्याजवळील २७ हजार रुपये जबरीने चोरुन नेले. ही घटना भोकर ते रहाटी रस्त्यावर म्हैसा पाटीजवळ रविवारी (ता. १५) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. 

ट्रक चालक बालाजी अंधारे (वय ४०) रा. मोघाळी (ता. भोकर) हे आपला ट्रक (एमएच२६-एडी-२८४) मध्ये ओरीएंट सिमेंट घेऊन तेलंगणातील मंचीलयार येथून नांदेडला घेऊन येत होते. परंतु त्यांचा ट्रक (एमएच२६-७४३५) वरुन आलेल्या दुचाकीस्वारांनी भोकर ते राहटी रस्त्यावर अडविला. तुझ्या ट्रकमुळे खूप धुराळा उडत आहे. आमचे कपडे खराब होत आहेत असे म्हणून ट्रक चालकास व त्याच्या सहकाऱ्यास खाली ओढून मारहाण केली. एवढेच नाही तर त्यांच्याजवलचे नगदी २७ हजार रुपये जबरीने चोरुन घेतले. बालाजी अंधारे यांच्या फिर्यादीवरुन भोकर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरिक्षीक श्री. कांबळे करत आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wheat truck burnt at Waranga Fata hingoli news