esakal | देठणा प्रकरणातील फरार आरोपी अटक कधी होणार?
sakal

बोलून बातमी शोधा

Rahuri Datir murder

गेल्या काही महिन्यांपासून ग्रामीण पोलिस ठाण्यात हद्दीमध्ये अनेक गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. खून, जीवे मारण्याचा प्रयत्न, चोरी, घरफोडी, विनयभंग, शासकीय कामात अडथळा असे गंभीर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण इतिहासात पहिल्यांदाच वाढले आहे.

देठणा प्रकरणातील फरार आरोपी अटक कधी होणार?

sakal_logo
By
युवराज धोतरे

उदगीर (जि.लातूर) : तालुक्यात (Udgir) अगदी किरकोळ गुन्ह्याचे प्रमाण असलेल्या ग्रामीण पोलिस ठाण्याकडे (Udgir Rural Police Station) सध्या पोलिस निरीक्षकांचे दुर्लक्ष झाल्याने गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. दैठणा (ता.शिरूर अनंतपाळ) प्रकरणातील फरार आरोपी अटक कधी होणार? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील दैठणा येथे गेल्या आठ-दहा दिवसांपूर्वी दोन गटात गंभीर हाणामारी झाली होती. त्यात पाच ते सहा जणांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी तब्बल २० आरोपींवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी एका गटाचे फक्त तीन आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. पैकी काही दवाखान्यात आहेत तर उर्वरित सर्व आरोपी फरार आहेत. या फरार आरोपींना अटक होणार का? हा प्रश्न आता नागरिक उपस्थित करित आहेत. (When Accused of Dethan Case Will Arrest Latur News?)

हेही वाचा: 'माझ्या आत्महत्येस मीच जबाबदार आहे, आई-बाबा बाय'

गेल्या काही महिन्यांपासून ग्रामीण पोलिस ठाण्यात हद्दीमध्ये अनेक गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. खून, जीवे मारण्याचा प्रयत्न, चोरी, घरफोडी, विनयभंग, शासकीय कामात अडथळा असे गंभीर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण इतिहासात पहिल्यांदाच वाढले आहे. हे प्रमाण का वाढले आहे? याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी होणे आवश्यक आहे. यातील अनेक आरोपींना जाणीवपूर्वक फरार होण्यास ग्रामीण ठाण्याकडून मदत करण्यात येत असल्याची चर्चा अनेक वेळा होत आहे. अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपी जवळपास सहा ते आठ महिन्यापर्यंत फरार आहेत. या आरोपींना फरार ठेवण्यामध्ये पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याने या आरोपींचे बळ वाढले असून पुन्हा गंभीर गुन्हे करण्याचे मनोबल वाढत आहे. उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात जेमतेम गुन्हेगारीचे प्रमाण असताना अचानक पणे एवढे गंभीर गुन्हे का वाढले? याची चौकशी होणे आवश्यक आहे.

वरिष्ठांवरही दबाव आहे का?

यापूर्वी हैबतपुर प्रकरणात वेळेत गुन्हा दाखल झाला नसल्याने उदगीर शहरात दगडफेक होऊन अशांतता निर्माण झाली. या प्रकरणी ग्रामीण पोलिस निरीक्षकाऐवजी त्यावेळच्या शहर पोलिस निरीक्षकाची बदली करण्यात आली. ग्रामीण पोलिस निरीक्षकांना पाठीशी घालणाऱ्या अनेक घटना घडल्या. त्यामुळे वरिष्ठ कार्यालय सुद्धा दबावात आहे की काय ? याची जोरदार चर्चा सुरू आहे.

गेल्या काही दिवसापासून ग्रामीण हद्दीत गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. पोलिस विभाग गुन्हे दाखल करून आरोपीवर कारवाई करण्याचे प्रयत्न करत आहे. फरार आरोपी संदर्भात आम्ही चौकशी करून त्यांना अटक करण्यासाठी आवश्यक असलेले कार्यवाही आम्ही निश्चितपणे करू.

- डॅनियल जॉन बेन, उपविभागीय पोलिस अधिकारी, उदगीर