

Who is IAS Ashima Mittal
Esakal
Manoj Jarange Patil Protest: अंतरवाली सराटीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या सहा दिवसांपासून उपोषण सुरू आहे. सरकारकडून अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी रात्री मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत चर्चा केली पण जरांगे पाटील हे मंत्र्यांनी भेट घ्यावी यावर ठाम आहेत. आपल्या मागण्या सरकारी स्तरावरच्या असल्यानं अधिकारी, पोलीस यांच्याशी चर्चा करून फायदा नसल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, पोलीस अधीक्षक तेघबीरसिंग संधू यांना शिष्टमंडळाचे प्रतिनिधी म्हणून अंतरवालीत पाठवण्यात आलं होतं.