Kalamb Drugs Racket : कळंबच्या ड्रग्ज रॅकेटचा ‘किंगपिन’ कोण?; बीड-पुणे कनेक्शन पोलीस तपासात उघड, पुरवठादार, विक्रेते आणि सेवन करणारे पोलिसांच्या रडारवर

कळंब शहरातील ड्रग्ज तस्करीचे जाळे नेमके कुठपर्यंत पसरले आहे, आणि या रॅकेटचा खरा ‘किंगपिन’ कोण, याचा शोध घेण्यात पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे लागले हाती.
Drug Racket

Drug Racket

ESakal

Updated on

कळंब - कळंब शहरातील ड्रग्ज तस्करीचे जाळे नेमके कुठपर्यंत पसरले आहे, आणि या रॅकेटचा खरा ‘किंगपिन’ कोण, याचा शोध घेण्यात पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. या प्रकरणात दोन नवीन आरोपी उघड झाले असून ड्रग्ज रॅकेटचे बीड आणि पुणे कनेक्शन समोर येत आहे. या कनेक्शनचा तपास करण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. दरम्यान या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपीना शुक्रवार (ता. सात) कळंब न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना सोमवार (ता.10) पर्यंत पोलीस कोठीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com