डॉक्टरांच्या आरोग्याची काळजी घेणार कोण? अनेक सुविधा मिळेनात

Doctor News, Latur
Doctor News, Latur
Updated on

लातूर  ः कोरोना विषाणुची भिती सर्वसामान्यांच्या मनात आहे. त्याला डॉक्टरही अपवाद राहिलेले नाहीत. डॉक्टरांच्या आरोग्याची काळजीही तितकीच महत्त्वाची झाली आहे. सध्या लातूरमध्ये शेकडो खासगी डॉक्टर आहेत. पण त्यांना पर्सनल प्रोटेक्शन इक्युपमेंन्ट कीट मिळत नाही. हात धुण्यासाठी लागणाऱ्या सॅनिटायझरचा तुटवडा आहे. कोरोना विषाणुपासून बचाव करण्यासाठी लागणारा मास्क मिळत नाही. अशा परिस्थितीत या खासगी डॉक्टरांना काम करावे लागत असल्याने त्यांचे आरोग्यच धोक्यात आले आहे. उपाय योजना करणाऱ्या शासनाने पहिल्यांदा डॉक्टरांची काळजी घेण्याची वेळ आली आहे.


कोरोना विषाणुची जशी भिती सर्वसामान्य नागरिकांत आहे त्यापेक्षा जास्त भिती डॉक्टरांमध्ये आहे. समोर येणार रुग्ण हा कोरोना बाधित आहे की नाही हे ओळखणे कठीण आहे. त्यामुळे शहरातील अनेक डॉक्टरांनी आपले क्लिनिक बंद ठेवणेच पसंद केले आहे. शहरातील आयसीयु तसेच मोठे रुग्णालय सुरु आहेत. पण त्यांना उपचार करताना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. खासगी डॉक्टरनी आपले रुग्णालय, क्लिनिक बंद करू नये असे शासन वारंवार सांगत आहे. पण त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत काळजी घेताना मात्र दिसत नाही. त्यामुळे डॉक्टरमध्येच अधिक भिती आहे.


कोरोनाच्या भितीमुळे अनेक रुग्णालयातील बहुतांश कर्मचारी, कामगारही आता कामावर येत नाहीत. मोजक्या कामगारावरच डॉक्टर काम करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या संदर्भात डॉक्टरांना लागणाऱया वैद्यकीय साहित्याचाच तुटवडा झाला आहे. हा कृत्रिम तुटवडा असल्याचे सांगितले जाते. नेहमीच्या साठा करणाऱ्यांकडून साठ नसल्याचे उत्तर या डॉक्टरांना ऐकायला मिळत आहे. त्यामुळे शहरातील अनेक डॉक्टर आता सर्दी, खोकला असा रुग्ण आला तर त्याच्यावर उपचार न करता सरळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी पाठवता दिसत आहेत. पण इतर रुग्णांवर उपचार करताना देखील प्रोटेक्शनच नसल्याने डॉक्टरांच्या मनात भिती आहे. सर्वत्र उपाय योजना करणाऱया शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तरच कोरोना व्यतिरिक्त असलेल्या रुग्णांना उपचाराचा दिलासा मिळणार आहे.


आपली ऐंशी टक्के आरोग्य सेवा ही खासगी डॉक्टरावर अवलंबून आहे. सध्या कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत आहे. त्यामुळे गरज पडल्यास शासकीय रुग्णालयात सेवा देण्याची तयारही आम्ही दाखवली आहे. पण सध्या खासगी डॉक्टरांचेच आरोग्य धोक्यात आहे. पीपीई कीट मिळत नाही. उपचार करण्यापूर्वी डॉक्टर व स्टाफला एचसीक्यू या टॅबेलेट द्याव्या लागतात. त्या बाजारातून गायब आहेत. मास्क मिळत नाहीत. सॅनिटायझरचा पत्ता नाही. या वस्तू शासनाने उपलब्ध करून देण्याची गरज आहे. शासकीय डॉक्टर, कर्मचाऱ्यांचा जसा शासनाने विमा उतरवला आहे, तसाच विमा खासगी डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा उतरवला गेला तर त्यांचे मनोबल वाढणार आहे.
- डॉ.अजय जाधव, अध्यक्ष, भारतीय वैद्यकीय संघटना


आम्ही सेवा द्यायला तयार आहोत. सध्याच्या परिस्थितीत जीव धोक्यात घालून काम सुरु आहे. आमच्या आरोग्याची काळजी शासनाने घेण्याची गरज आहे. कोरोनाच्या विषाणुपासून बचाव करण्यासाठी लागणारे वैद्यकीय साहित्याच्या संदर्भात शासनाने काही तरी तरतूद करण्याची गरज आहे. असे झाले तरच खासगी डॉक्टर पुढे येवून रुग्णावर उपचार करू शकतील.
डॉ. कल्याण बरमदे, अध्यक्ष, अखिल भारतीय स्त्री रोग संघटना जनजागृती समिती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com