मावळमध्ये कोणाचा मुलगा पडला? मुलीलाही निवडून आणता आलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना बजरंग सोनवणेंचे प्रत्युत्तर

Bajrang Sonavane on Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंकजा मुंडे यांच्यासाठीच्या प्रचारसभेत सोनवणे यांना एकप्रकारे दम भरला होता. याला सोनवणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
ajit pawar Bajrang Sonavane
ajit pawar Bajrang Sonavane

मुंबई- बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक रंगात आली आहे. बीडमध्ये भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनावणे यांच्यामध्ये लढत होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंकजा मुंडे यांच्यासाठीच्या प्रचारसभेत सोनवणे यांना एकप्रकारे दम भरला होता. याला सोनवणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

सोनवणे यांना आपली मुलगी ग्रामपंचायत-नगरपालिकेसाठी निवडून आणता आली नाही, अन् तरी ते लोकसभेसाठी उभे आहेत. पैसा आला म्हणजे मस्ती आली का? असं अजित पवार म्हणाले होते. यावर सोनवणेंनी प्रत्युत्तर दिलंय की, 'मला मुलगी निवडून आणता आली नाही म्हणता, मग तुम्हाला तुमचा मुलगा मावळमधून का निवडून आणता आला नाही?.'

ajit pawar Bajrang Sonavane
Raj Thackeray : ''अजित पवारांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही'' राज ठाकरे पुण्यात नेमकं काय म्हणाले?

बजरंग सोनवणे काय म्हणाले?

तुम्हालाच राजकारण करता येतं आणि आम्हाला करता येत नाही असं नाही. आम्ही सुद्धा एका भूमिकेने ठरवून सहा महिन्यांसाठी शांत राहिलो. साहेबांनी सांगितलं लोकसभा लढायची म्हणून मी रिंगणात उतरलो. मला म्हणताय मला मुलगी निवडून आणता येत नाही, मावळ लोकसभा निवडणुकीत कोणाचा मुलगा पराभूत झाला दादा? याचं उत्तर आधी तुम्हाला जनतेला द्यावं लागेल.

तुम्हालाही तुमचा मुलगा निवडून आणता आला नाही. ज्यांनी तुम्हाला कानात सांगितलं त्यांना त्यांचे वडील जिल्हा परिषद गटामध्ये निवडून आणता आले नाहीत. आमची मापं काढता, तुमचा माप बीडची जनता काढल्याशिवाय राहणार नाही, असं सोनवणे म्हणाले.

ajit pawar Bajrang Sonavane
Sharad Pawar : "बालबुद्धीने बोलतात.." आमदारावर टीका करणाऱ्या अजित पवारांना शरद पवारांनी फटकारले

अजित पवार काय म्हणाले होते?

पंकजा ताईच्या विरोधात बजरंग सोनवणे उभे आहेत. ते माझ्याकडे यायचे, माझ्या कारखान्याची कॅपेसिटी वाढवून द्या ना अशी विनंती करायचे. मी देणार नव्हतो, पण धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरुन ती मी दिली. दोन पैसे हाती आले की मस्ती येते का? मला माहिती होतं हे कुठंतरी पलटणार आहे. छाती फाडून दाखवतो म्हणायचे. छाती फाडली की मरुन जातं. उगाच कशाला गप्पा मारायच्या, असं पवार म्हणाले.

सगळं बरं चाललं होतं. पण, त्यांना काय अवदसा आठवली माहिती नाही. आता निवडणुकीला उभे राहिले आहेत. मागे उभा राहून पडायची ट्रायल झाली आहे. आता कशाला उभा राहायचं. हा पठ्ठ्या स्वत: खासदारकीला पडला. स्वत:च्या मुलीला ग्रामपंचायत-नगरपालिकेमध्ये निवडून आणता आलं नाही. तुम्हाला मुलीला ग्रामपंचायत-नगरपालिकेत निवडून आणता येत नाही आणि खासदार व्हायला निघाला आहात, असं म्हणत पवारांनी निशाणा साधला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com