विद्यार्थ्यांना का हवा ‘शिवभोजना’चा आधार

शिवचरण वावळे
शनिवार, 1 फेब्रुवारी 2020

नांदेड शहरात खासगी शिवकणी वर्ग, अभ्यासिका या सोबतच खानावळी मोठ्याप्रमाणावर वाढल्या आहेत. परंतू, एकाही खानावळीत विद्यार्थ्यांना परवडेल, असे जेवण मिळत नसल्याने शहरात राहुन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आर्थिक बजेट बिघडत असून, विद्यार्थ्यांनसाठी ‘शिवभोजन’ केंद्र सुरु करण्याची मागणी केली जात आहे. 

नांदेड : पुणे, औरंगाबाद नंतर नांदेड शहरदेखील वैद्यकीय शैक्षणाचे हब म्हणून ओळखळे जाऊ लागले आहे. त्यामुळे शहरात राहुन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. सहाजिकच यामुळे शहरात खासगी शिवकणी वर्ग, अभ्यासिका या सोबतच खानावळी मोठ्याप्रमाणावर वाढल्या आहेत. परंतू, एकाही खानावळीत विद्यार्थ्यांना परवडेल, असे जेवण मिळत नसल्याने शहरात राहुन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आर्थिक बजेट बिघडत असून, विद्यार्थ्यांनसाठी ‘शिवभोजन’ केंद्र सुरु करण्याची मागणी केली जात आहे. 

शनिवारी (ता.एक) रोजी श्रीनगर पासून ते अन्न व औषध प्रशासन कार्यालया आणि त्या नंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे शेकडो विद्यार्थ्यांनी मोर्चा काढून जास्तीचे पैसे उकळुनदेखील चांगल्या दर्जाचे जेवण मिळत नाही. अनेक खानावळ चालकांनकडे अन्न औषध प्रशासनाचा परवाना नसतानादेखील ते खानावळ चालवत आहेत. त्यांच्याकडून उत्तम दर्जाच्या जेवणाची अपेक्षा करणे चुकीचे असून, अन्न औषध प्रशासन विभागाने शहरातील अवैध खानावळीची तपासणी करावी अशी मागणी केली आहे

 

.हेही वाच-  Budget 2020 - अर्थसंकल्पाबाबत ‘काय’ म्हणतात नांदेडकर...वाचा... विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम

त्या नंतर विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन शहरातील खानावळीचा दर निश्चित करावेत. ते दर विद्यार्थी व पालकांच्या खिशाला परवडतील असे असावे. शहरातील सर्व खानावळीचे दर समान असावेत त्यांच्या जेवणाची गुणवत्त तपासली जावी. भेसळयुक्त जेवण दिले जात असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून, याकडे जिल्हाधिकारी व अन्न व औषध प्रशासन विभागाने विशेष लक्ष द्यावे. सध्याचे दर विद्यार्थ्यांना न परवडणारे असून, विद्यार्थ्यांना हे दर मान्य नाहीत. अशा विविध मागण्या देखिल विद्यार्थ्यांनी केल्या. 

हेही वाचलेच पाहिजे -  गणित- विज्ञान विषयाच्या भावी गुरुजींना प्रतिक्षा - कशाची ते वाचा

श्रीनगर भागात विना परवाना मेसचा धंदा-
श्रीनगर भागात सर्वाच जास्त खासगी शिकवणी वर्ग आणि अभ्यासिका आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची सर्वात जास्त वर्दळ याच भागात दिसून येते. या ठिकाणच्या अनेक रहिवाशांनी देखिल घरगुती खानावळ सुरु करुन उपजीविकेचे नवीन साधन शोधले आहे. अनेकांनी अखे घरच्या घरच कॉट'बेसवर देऊन महिण्याला लाखो रुपयाची कमाई सुरु केली आहे. परंतु अनेक घरात सुरु असलेल्या मेस वाल्यांना अन्न औषध प्रशासन विभागाची मान्यताच नाही. तरीदेखील घरगुती मेस चावलल्या जात आहेत. त्यामुळे या मेसच्या जेवणातील गुणवत्तेकडे कुणाचेही लक्ष नाही. विशेष म्हणजे ज्या भागात अन्न व औषध प्रशासन विभागाचे कार्यालय असून देखील त्यांच्याकडून जाणीव पूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why students want 'Shiv Meal' basis