esakal | पत्नीच्या निधनाचे दुःख अनावर, हृदयविकाराने पतीचा गेला जीव
sakal

बोलून बातमी शोधा

Rahim Shaikh

शेख रहीम शेख लाल यांच्या पत्नी हसीना (५४) यांना उपचारासाठी लातूर येथील खासगी दवाखान्यात चार दिवसांपूर्वी दाखल केले होते.

पत्नीच्या निधनाचे दुःख अनावर, हृदयविकाराने पतीचा गेला जीव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

किल्लेधारूर (जि.बीड) : शहरातील अजीजपुरा भागात राहणाऱ्या शेख हसीना (वय ५८) यांचे निधन झाले. पत्नी सोडून गेल्याचा धक्का पती शेख रहीम शेख लाल यांना अनावर झाला. धक्का सहन न झाल्याने त्यांचाही ह्रदयविकाराने दवाखान्यातच शुक्रवारी (ता.१५) रात्री मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. शेख रहीम शेख लाल यांच्या पत्नी हसीना (५४) यांना उपचारासाठी लातूर येथील खासगी दवाखान्यात चार दिवसांपूर्वी दाखल केले होते.

त्यांच्यावर उपचार सुरु असताना शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास निधन झाले. यावेळी दवाखान्यात उपस्थित असलेले त्यांचे पती शेख रहीम यांना पत्नीच्या निधनाचा धक्का सहन न झाल्यामुळे त्यांनाही ह्रदयविकाराचा तीव्र धक्का बसला. उपचारादरम्यान त्यांचीही शुक्रवारीच प्राणज्योत मालवली. शेख रहीम हे व्यापारी होते. शहरात प्रथमच अशी हृदयद्रावक घटना घडली. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. पती-पत्नीवर शनिवारी (ता.16) सकाळी तहसील कार्यालयासमोरील तकीया तलाव परिसरातील कब्रस्तानमध्ये दफनविधी करण्यात आला.

संपादन - गणेश पिटेकर