Vashi Crime : ‘तुझाही संतोष देशमुख करू’ म्हणत सरपंचाला मारहाण; पवनचक्कीच्या कामावरून घडली घटना

‘तुझा ही संतोष देशमुख करणार’ अशी धमकी देत वाशी तालुक्यातील शेंडीचे सरपंच व त्यांच्या पुतण्याला १५ ते २० जणांनी जबर मारहाण केली.
sarpanch tukaram vir

sarpanch tukaram vir

sakal

Updated on

वाशी (जि. धाराशिव) - ‘तुझा ही संतोष देशमुख करणार’ अशी धमकी देत तालुक्यातील शेंडीचे सरपंच तुकाराम वीर यांच्यासह त्यांच्या पुतण्याला १५ ते २० जणांनी जबर मारहाण केली. ही घटना गुरुवारी (ता. आठ) सकाळी अकराच्या सुमारास घडली. दोन्ही जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com