परभणी : खेळाडूंना वय लपविणे आता अशक्य होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Directorate of Sports and Youth Services.

परभणी : खेळाडूंना वय लपविणे आता अशक्य होणार

परभणी - शालेय व अन्य क्रीडा स्पर्धांत खेळाडूंच्या वय लपविण्याची प्रकरणे समोर येत असल्यामुळे आता क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. वयाच्या पुराव्यासाठी काही कागदपत्रे अनिवार्य केली आहेत. त्यामुळे आता खेळाडूंसह त्यांचे प्रशिक्षक, मार्गदर्शक संस्थांना वयाची चोरी करणे अशक्य होईल. स्पर्धा निर्विवाद होतील. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध शालेय व अन्य क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंच्या वय लपवून किंवा कमी दाखवून स्पर्धेत खेळविण्याचे अनेक प्रकार होत आहेत. यासंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी येऊ लागल्यामुळे हे नवे नियम लागू केले जाणार आहेत. त्यातून वय लपविणे, चुकीचे सांगणे आदी प्रकारांना आळा बसणार आहे. या नियमानंतरही असे प्रकार आढळल्यास खेळाडूंसह संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत संचालनालयाने दिले आहेत.

यासंदर्भात क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी विभागीय क्रीडा उपसंचालक व जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. त्यानुसार जन्मतारीख निश्चितीसाठी पुरावा अनिवार्य केला आहे. खेळाडूंच्या जन्मतारखेची खातरजमा करण्यासाठी संबंधित खेळाडूंचे वय एक वर्षापर्यंत असताना संबंधित शासकीय विभागाने वितरित केलेला जन्मदाखला किंवा खेळाडूचे वय किमान पाच वर्षापर्यंत असताना संबंधित शासकीय विभागाने िदलेला जन्मदाखला किंवा खेळाडूच्या वयाची पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर शासकीय विभागाचा जन्मदाखला असेल तर खेळाडूच्या पहिल्या इयत्तेतील प्रवेश घेतलेल्या जनरल रजिस्टरची सत्यप्रत अनिवार्य आहे. या तीनपैकी एका पुराव्यासोबत आधारकार्ड किंवा पासपोर्ट अनिवार्य आहे. त्याचबरोबर शालेय प्रवेश अर्ज, जन्मदाखला, पहिल्या इयत्तेतील जनरल रजिस्टरमधील जन्मतारीख व आधारकार्ड अथवा पासपोर्ट या मधील नमूद जन्मतारीख सारखीच असणे आवश्यक आहे. तसे नसल्यास खेळाडूस संबंधित वयोगटासाठी पात्र समजले जाऊ नये, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Will Now Be Impossible For Players To Hide Their Age

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :ParbhanisportsAgeplayers
go to top