जिल्ह्यातील विकास कामांना गती देणार- ना.चव्हाण 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जानेवारी 2020

विविध विषयांची आढावा बैठक येथील शासकीय विश्रामगृह, मिनी सह्याद्री येथे आज संपन्न झाली. यावेळी मंत्री तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण बोलत होते.  

नांदेड : जिल्ह्यातील विविध विकास कामे वेळेत, दर्जेदार पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले.
विविध विषयांची आढावा बैठक येथील शासकीय विश्रामगृह, मिनी सह्याद्री येथे आज संपन्न झाली. यावेळी मंत्री तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण बोलत होते.  

या बैठकीस आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार रावसाहेब अंतापूरकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महापौर दिक्षा धबाले, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक श्री. कोहिरकर, अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, जिल्हा परिषदेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, उपविभागीय अधिकारी लतिफ पठाण, उपजिल्हाधिकारी सदाशिव पडदुणे, कार्यकारी अभियंता अविनाश धोंडगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे आदि विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

हेही वाचा ---आयुर्वेदातील ‘हे’ गुणकारी झाड होतंय दुर्मिळ : कोणते ते वाचा

मुखेड तालुक्यात हेलीपॅड 

बैठकीत मंत्री श्री. चव्हाण पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील किनवट,माहूर,देगलूर,भोकर,मुखेड तालुक्यात हेलीपॅड बांधण्याकरिता भूसंपादन करुन शासकीय अथवा खाजगी जमिनीवर पायलेट प्रोजेक्ट म्हणून करण्याकरिता कार्यवाही करण्यात यावी. यासोबतच हेलिपोर्टसाठीही प्रयत्न करण्यात यावेत. तसेच आसना जूना पूल / ब्रीज बांधण्याकरिता प्रस्ताव सादर करावेत. ट्रामा केअरबाबत पाठपुरावा करण्यात यावा. अर्धापूर ग्रामीण रुग्णालयाच्या कामे पूर्ण करावीत. अर्धापूर तालुक्यातील मालेगाव हनुमानमंदिराजवळील सभागृहाच्या अर्धवट राहिलेल्या कामांची माहिती, नांदेड-भोकर-रहाटी महामार्गाचे काम दर्जेदार पूर्ण करावीत व अहवाल सादर करावा. तसेच उर्वरित कामांचे प्रस्तावही सादर करण्यात यावेत. मातूळ ता. भोकर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रिक्त पदे भरणे, नगर परिषद, भोकरच्या कार्यालयाच्या अर्धवट असलेल्या कामाबाबतची सविस्तर माहिती घेतली. 

येथे क्लीक कराच ---तिन लाखासाठी ३२ हजार गमावले...

पाणी पुरवठ्याबाबतचा आढावा 

भोकर व अन्य तालुक्याच्या पाणी पुरवठा योजनेचा राष्ट्रीय पेयजल आणि इतर पाणी पुरवठ्याबाबतचा आढावा घेतला. देगलूर नाका येथील ओव्हर ब्रीजच्या कामाबाबतचे जिल्हाधिकारी, मनपा व अधिक्षक अभियंता यांनी नियोजन करावं. तसेच डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडील विविध समस्या, भोकर येथे पोलीस ट्रेनिंग स्कूल सुरु करण्याबाबतही कार्यवाही करण्यात यावी. नांदेड सामान्य रुग्णालयाच्या सद्यस्थिती, कौठा ले-आऊट सद्यस्थिती, विकास कामे, भूसंपादन आदि विविध विकास कामांचा सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आढावा घेतला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will speed up development work in the district - Na Chavan