Ramdas Athawale: ओला दुष्काळाच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांशी बोलू; मंत्री रामदास आठवले यांची माहिती
Dharashiv Rain: धाराशिवसह इतर भागांत अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अधिक मदतीसाठी प्रयत्न करण्याचे सांगितले.
धाराशिव : अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यासह अन्यत्र पिकांचे मोठे नुकसान झाले असून, ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे.