खंडणी व खुनाच्या आठवडाभरापूर्वी त्याने केजमध्ये वाईन शॉप उघडण्यासाठी प्रक्रिया केल्याचे समोर आले आहे.
बीड : सरपंच संतोष देशमुख यांची (Santosh Deshmukh Murder Case) निर्घृण हत्या आणि पवनचक्की खंडणी प्रकरणानंतर बीड जिल्हा राज्यात चर्चेत आहे. या सर्वांच्या केंद्रस्थानी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंचा (Dhananjay Munde) निकटवर्तीय वाल्मिक कराड (Valmik Karad) आहे. कराडवर खंडणीचा गुन्हा नोंद झाल्यानंतर ‘समाजसेवक’ म्हणून त्याचे समर्थनही केले जात आहे.