पाचोड - मे मध्ये बेमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पैठण तालुक्यात बहुतांश जलसाठ्यात वाढ झाल्याने सत्तर गावांतील एक लाख २९ हजार ४९४ नागरिकांची तहान भागविणारे एकाहत्तर टँकर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशा ने बंद करण्यात आले असून अद्याप काही ठिकाणी पाण्यासाठी भटकंती सुरु असल्याचे चित्र पाहवयास मिळते.