esakal | लातूरात मालमत्ता कराची सात दिवसांत एक कोटीची वसुली : मोठे थकबाकीदार मात्र मोकाटच

बोलून बातमी शोधा

Latur mahanagrpalika
लातूरात मालमत्ता कराची सात दिवसांत एक कोटीची वसुली : मोठे थकबाकीदार मात्र मोकाटच
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

लातूर : शहरातील मालमत्ता करात थकबाकीवरील व्याज शंभर टक्के सूट व बारा टक्के करात सूट देण्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर सर्वसाधारण सभेने घेतलेला ठराव महापालिकेच्या प्रशासनाकडे आला. त्यानंतर गेल्या सात दिवसांत प्रशासनाच्या वतीने कराच्या वसुलीची मोहिम हाती घेण्यात आली असून या सात दिवसांत एक कोटी रुपये कराची वसुली झाली आहे. यातून सवलत जाहीर केल्यानंतर सामान्य लातूरकर त्याला प्रतिसाद देत आहे. पण मोठे थकबाकीदार मात्र अद्यापही मोकाटच आहेत.
हे वाचलंत का- आधी पत्नीचा गळा घोटला, नंतर गर्भवती प्रेयसीलाही संपविले, बीडच्या हैवानाला जन्मठेप..

लातूर शहरातील मालमत्ताधारकांकडे सुमारे ८० कोटींची थकबाकी आहे. त्यात गेल्या काही वर्षापासून मालमत्ता करात वाढ केल्याने त्याला विरोध झाला. काही संघटना न्यायालयात गेल्या. लोकप्रतिनिधींनी देखील या करवाढीला विरोध केला. प्रशासनाच्या वतीने करवाढ केली नाही फक्त मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे असे सांगण्यात येत होते. या सर्व प्रकारात गेल्या तीन वर्षात वसुलीचे प्रमाण २५ टक्केवरच आले होते.
महापालिकेच्या ता. २० फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत मोठा निर्णय घेण्यात आला. यात मालमत्ता कराच्या थकबाकीवरील सर्व व्याज माफ करण्यात आले. तसेच मालमत्ता करात १२ टक्के सूट देण्यात आली. पण ता. ३१ मार्चपर्यंत कराचा भरणा करणाऱ्य़ानांच ही सवलत मिळणार आहे. या संबंधीचा महापालिकेचा ठराव प्रशासनाकडे ता. २५ फेब्रुवारी रोजी देण्यात आला. त्यानंतर ता.२७ फेब्रुवारीपासून प्रशासनाच्या वतीने शहरात कराची वसुली केली जात आहे. प्रत्येक नगरात जावून कर भरण्याचे आवाहन केले जात आहे. या आवाहनाला लोकांचाही प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. गेल्या सात दिवसात एक कोटी रुपये कराची वसुली करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा आयुक्त जी. श्रीकांत यांनी प्रशासनाला एक महिन्यात साठ कोटी वसुलीचे उद्दीष्ट दिले आहे. यातून आता कर्मचारी कामाला लागले असून लातूरकर देखील या सवलतीचा फायदा घेताना दिसत आहेत.

कारवाई कधी होणार?

महापालिकेने सलवतीची घोषणा केल्यानंतर मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई करण्याची घोषणा करण्यात आली होती. पण अद्याप एकाही मोठ्या थकबाकीदारावर कारवाई करण्यात आलेली नाही. मोठे थकबाकीदार अद्याप कराचा भरणा करत नाहीत. तसेच येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील गाळेधारक तसेच एमआयडीसीतील उद्योजकांनी देखील कर भरण्याकडे पाठ फिरवली आहे. एमआयडीसीतील उद्योजकांकडे गेल्या तीन वर्षाची सुमारे १४ कोटींची थकबाकी आहे. तर बाजार समितीतील गाळेधारकांकडे गेल्या तीन वर्षाची तीन कोटीची थकबाकी आहे. पण याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

क्लिक करा- भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे अडचणीत, असे आहे प्रकरण...
प्रसिद्धीचा अभाव
महापालिकेला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी व लातूरकरांना कराचा भरणा करावा म्हणून ही सवलत योजना जाहीर करण्यात आली आहे. पण महापालिकेकडून चौकाचौकात सवलत काय दिली जाणार आहे याचे पोस्टर लावण्यात आलेले नाहीत, प्रत्येक वॉर्डात कर वसुलीचे कॅम्प लावण्यात आलेले नाहीत. अनेकांना या योजनेचीही माहिती नाही. महापालिकेकडे सध्या प्रसिद्धीचा अभाव दिसून येत आहे.याकडे नगरसेवकांनी देखील पाठ फिरवल्याचेच चित्र आहे.

मालमत्ता कराच्या वसुलीसाठी बिल कलेक्टर प्रयत्न करीत आहेत. यातून सात दिवसांत एक कोटीवर वसुली झाली आहे. आपण व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार मोठ्या थकबाकीदारांना फोन करून कराचा भरणा करण्याचे आवाहन करीत आहोत. मोठ्या थकबाकीदारांनी तातडीने कराचा भरून महापालिकेला सहाकार्य करण्याची गरज आहे.
- विक्रांत गोजमगुंडे, महापौर.

हेही वाचा-  गीतांजलीच्या चारित्र्यावर शरदला संशय होता, मग कपाशीच्या पऱ्हाट्यावरच...