फुलंब्री तालुक्यात लांडग्याने केल्या नऊ शेळ्या फस्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 डिसेंबर 2019

गणोरी (ता. फुलंब्री) येथील शेळी पालन करणाऱ्या शेतकऱ्याच्या एकाच वेळी नऊ शेळ्या लांडग्याने फस्त केल्या. त्यामुळे या शेतकऱ्याने नुकताच नव्याने सुरू केलेला हा शेतीपुरक व्यवसाय बुडाला आहे. यात शेतकऱ्याचे तब्बल पन्नास हजारांचे नुकसान झाले आहे. ही घटना बुधवारी (ता.18) दुपारी चारच्या सुमारास घडली.

फुलंब्री (जि.औरंगाबाद ) : गणोरी (ता. फुलंब्री) येथील शेळी पालन करणाऱ्या शेतकऱ्याच्या एकाच वेळी नऊ शेळ्या लांडग्याने फस्त केल्या. त्यामुळे या शेतकऱ्याने नुकताच नव्याने सुरू केलेला हा शेतीपुरक व्यवसाय बुडाला आहे. यात शेतकऱ्याचे तब्बल पन्नास हजारांचे नुकसान झाले आहे. ही घटना बुधवारी (ता.18) दुपारी चारच्या सुमारास घडली.

हेही वाचा-बेकायदा घरांवर चालवा जेसीबी

गणोरी येथील शेतकरी नामदेव काशीनाथ करडे यांची गट क्रमांक 586 मध्ये शेती आहे. अद्रक शेतीच्या जमिनीत त्यांनी शेळ्या बांधून ठेवल्या होत्या. बुधवारी दुपारी शेतीचे काम सुरू असताना अचानक लांडग्यांच्या कळपाने शेळ्यांवर हल्ला केला. आरडा ओरड केल्यानंतर परिसरातील लोक जमा होईपर्यंत लांडग्यांनी सात शेळ्या फस्त केल्या.

हे वाचलंत का?नांदेडात डॉ. श्रीराम लागू यांच्या आठवणींना उजाळा 

दोन शेळ्या जखमी झाल्या आहे. शेतकरी करडे यांनी आपल्या शेतीला पुरक व्यवसाय म्हणून अर्ध बंदीस्त शेळी पालन व्यवसायास नुकतीच सुरुवात केली होती. त्यात त्यांच्या नऊ शेळ्या होत्या. ते या शेळ्यांना दिवसा आपल्याच शेतात चरण्यासाठी सोडायचे. बुधवारी लांडग्यांनी हल्ला चढवून सर्व नऊ शेळ्या फस्त केल्या. त्यामुळे शेतकऱ्याने सुरू केलेल्या या व्यवसायास नमनालाच नाट लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. संबंधित शेतकऱ्याला वन विभागाने तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. या घटनेचा पंचनामा वन विभागाचे कर्मचारी आणि पशु वैद्यकीय कर्मचारांनी केला आहे.

वन्य प्राण्याने शेतकरी धास्तावला

गणोरी परिसरात वन विभागाचे वन क्षेत्र आहे. त्यात काही वन्य प्राणीही आहेत. वन क्षेत्राला कुठलेही कुंपण नाही. त्यामुळे वन्य प्राणी वन क्षेत्रात त्यांना खायला कमी पडले की ते थेट शेतकऱ्यांच्या शेताकडे वळतात. वन विभागाचे कर्मचारी यांचे नियंत्रण येथे नाही. त्यामुळे शेतकरी वन्य प्राण्यांच्या नुकसानीला पार मेटाकुटीला आला आहे

हे वाचाच- आजवर जे राहून गेले, त्या सर्वांचा हा पुरस्कार : अनुराधा पाटील : पहा Video


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wolf Attacked On Goats Phulambri