- ज्ञानेश्वर बोरूडे
लोहगाव - पैठण तालुक्यातील जायकवाडी जलाशयाच्या जुने लामगव्हान जल फुगंवटा क्षेत्रातील नाकाडी शिवारात सोमवार (ता. १९) सायंकाळी अचानक वादळीवाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसात बैलगाडीजवळ पाल ठोकत असताना मेंढपाळ महिलेचा वीज धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना साडेपाच ते सहा वाजेदरम्यान घडली आहे. प्रियांका अंबादास काळे (वय-२६) असे मृत महिलेचे नाव आहे.