Beed News: गरोदर महिलेच्या जिवाशी खेळ कशासाठी? लेबर रूमसमोरच महिलेची प्रसूती, बीड जिल्हा रुग्णालयातील प्रकार
Beed Hospital: शिरूर ग्रामीण रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयात रेफर केलेल्या महिलेला लेबर वॉर्डमध्ये दुर्लक्ष केल्यामुळे गेटसमोर प्रसूती करावी लागली. आरोग्यसेवा दर्जेदार असतानाही कर्मचाऱ्यांच्या अरेरावीमुळे हा गंभीर प्रकार घडला.
बीड: खासगी डॉक्टरांनी प्रसूतीसाठी दिलेल्या तारखेच्या दोन दिवसांनी शिरूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या महिलेला शनिवारी जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले.