चोऱ्या करणाऱ्या महिलांना पकडले

file photo
file photo

जिंतूर (जि. परभणी) : शहरातील आठवडे बाजाराच्या दिवशी गर्दीमध्ये नागरिकांच्या खिशातील रोख रक्कम चोरणाऱ्या चार महिलांना पोलिस जमादार लिला जोगदंड यांनी पकडले व बुधवारी (ता. २२) न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांची शुक्रवार (ता. २४) पर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.

२२ ऑक्टोबर २०१९ रोजी रात्री नऊच्या सुमारास बाबूराव गंगाराम शिर्के हे शहरातील भाजीमंडईमध्ये भाजीपाला घेत असताना चार महिलांनी त्यांच्या खिशातील रोख दहा हजार रुपये चोरले. या बाबत शिर्के यांच्या तक्रारीवरून जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यानच्या काळातही अनेक रोख रक्कम व मोबाईल चोरीच्या घटना घडल्या होत्या. मागील महिन्यात (२४ डिसेंबर २०१९) रामराव परसराम घुगे हे वडिलांना दवाखान्यात नेण्यासाठी शहरात आले असता या महिलांनी त्यांचे लक्ष विचलित करून त्यांच्या खिशातील वीस हजार रुपये चोरले. 

चारही महिला ‘सीसीटीव्ही’ त कैद 
 या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या चारही महिला कैद झाल्या होत्या. दोन्ही गुन्ह्यांचा तपास महिला पोलिस कर्मचारी लीला जोगदंडे यांच्याकडे असल्याने त्या मंगळवारी (ता. २१) भाजीमंडई परिसरात गस्त घालत असताना त्यांना मीना मनोज हातागळे, रजिया सुजी ऊफाडे, दीपा विकी हातागळे, निशा मानू नाडे (सर्व राहणार नेताजीनगर, यवतमाळ) या संशयितरीत्या फिरत असताना आढळून आल्या. त्यांनी या महिलांना पोलिस स्थानकामध्ये आणून विचारपूस केली असता त्यांनी गुन्हे केल्याचे कबूल केले. त्यानंतर बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना २४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या महिलांच्या तपासणीत त्यांच्याकडून आणखी बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याची पोलिसांनी व्यक्त केली.


हेही वाचा ...

 छेडछाडप्रकरणी एकावर गुन्हा
गंगाखेड (जि.परभणी) : येथील बसस्थानकावर विद्यार्थिनीची छेडछाडप्रकरणी बुधवारी (ता. २२) दुपारी साडेतीनच्या सुमारास एकावर गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दररोजच्या वेळी एक महाविद्यालयीन विद्यार्थिनी गावाकडे जाण्यासाठी बसस्थानकावर बसची वाट पाहत असता उद्धव यादव हा कार घेऊन आला आणि विद्यार्थिनीला बळजबरीने कारमध्ये बस, अन्यथा मी तुझ्यासोबत बळजबरीने लग्न करणार आहे, असे म्हणत कारमध्ये बसवण्याचा प्रयत्न करत होता. विद्यार्थिनी सुटका करून घेत गावाकडे जाणाऱ्या बसमध्ये बसून जात असता आरोपी उद्धव यादव याने आपल्या कारने बसचा पाठलाग केला. महातपुरी या ठिकाणी बस थांबली असता आरोपी बसमध्ये जावून मुलीला धमकावले. हा प्रकार आई - वडिलांना सांगितला तर तुला ज्या प्रमाणे तिवठाणा येथील मुलीचे झाले तसे तुझे होइल, असे धमकावले. दरम्यान, याच बसमध्ये मुलीचा मामाही प्रवास करत होता. त्यालाहीधमकी देऊन भिसेगाव पाटीवर उतरला. झाला प्रकार मुलीने आई -वडिलांना सांगितला. पालकांनी गंगाखेड पोलिस ठाणे गाठत मुलीच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com