

Not for Complaints! Married Women Visit Jalna Police Station to Celebrate Vat Savitri
esakal
-उमेश वाघमारे
जालना : पोलिस ठाणे म्हटले की तक्रार, चौकशी किंवा गुन्ह्याच्या कामानिमित्त नागरिकांची वर्दळ असते. मात्र जालना शहरातील सदर बाजार पोलिस ठाण्यात वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी यापेक्षा वेगळे आणि आगळे-वेगळे चित्र पाहायला मिळते. सात जन्मी हाच नवरा लाभावा, पतीला दीर्घायुष्य मिळावे, यासाठी शृंगार केलेल्या महिला थेट सदर बाजार पोलिस ठाण्यात दाखल होतात. आणि येथील वडाच्या झाडाची विधिवत पूजा करून सात फेऱ्या मारतात.