
महिलांनी दारु विक्रेत्याला मुद्देमालासह पकडले, पोलिसांविरोधात रास्ता रोको
आखाडा बाळापूर (जि.हिंगोली) : कळमनुरी (Kalamnuri) तालुक्यातील पोतरा येथे गावातील महिलांनी एकत्र येत एका दारु विक्री करणाऱ्या महिलेला मंगळवारी (ता.एक) दारुच्या बाॅक्ससह ताब्यात घेतले. पोलिसांच्या विरोधात संताप व्यक्त करत पकडलेल्या दारूचे रस्त्यावरच प्रदर्शन भरवले. आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या पोतरा येथे अनेक दिवसापासून (Hingoli) अवैध देशी दारु विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. याबाबत वारंवार तक्रारी देऊन देखील पोलिस दखल घेत नसल्याने निराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मंगळवारी रेखा चेभेले, उर्मिला बर्गे ,अंजनी जामकर, सोनाबाई चौधरी, रेणुका खुडे, सुनिताबाई रानगिरे, अंकिता बाई झुंगरे, उर्मिला मुलगीर, संरपच रघुनाथरा गुहाडे, सामाजिक कार्यकर्ते विजयराव मुलगीर, विकास रानगिरे बालु रानगिरे, रघुनाथ पाटील, धाराजी मुलगीर, प्रभु पाटील, देवानंद मुलगीर, राजकुमार मुलगीर, राधेश्याम चेभेले आदींनी एकत्र येत सापळा रचून दारूचे बॉक्स पकडले आहेत. (Women Seized Liquor In Hingoli, Rasta Roko Against Police)
हेही वाचा: कोरोना काळातही पंतप्रधान मोदींमुळे देशाचा आर्थिक विकास : योगी आदित्यनाथ
दारू विक्रेत्यांना बाळापूर पोलिसांचे अभय असल्याचा आरोप करत या महिलांनी देशी दारूच्या (Country Side Liquor) बाटल्यांचे रस्त्यावर प्रदर्शन मांडत पोलिसांच्या विरोधात तासभर रास्ता रोको केला. दरम्यान आंदोलन करणाऱ्या महिलांचा संताप पाहून बाळापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत कार्यवाही सुरू केली आहे.
Web Title: Women Seized Liquor In Hingoli Rasta Roko Against Police
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..