चाकूर - तालूक्यातील ७१ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठीची दुसऱ्यांदा आरक्षण सोडत शुक्रवारी (ता.११) दुपारी पंचायत समितीच्या सभागृहात काढण्यात आली यात ३६ ठिकाणी महिलांना सरपंचापदाची संधी मिळणार आहे..जानवळ, आटोळा, बोथी, चापोली, नळेगाव, लातूररोड या मोठ्या ग्रामपंचायतीचे सरपंचपद महिलांसाठी आरक्षीत झाल्यामुळे इच्छुक नेत्यांची निराशा झाली आहे. तर पुर्वी काढलेल्या आरक्षणामध्ये अशतः बदल झाला आहे..तालूक्यातील ७१ ग्रामपंचायतीच्या सन २०२५ ते २०३० या कालावधीतील निवडणुकीकरीत २०११ च्या जणगणनेनुसार आरक्षण काढण्यात आले. यापुर्वी एप्रील महिन्यात आरक्षण काढण्यात आले होते. शासनाकडून हे आरक्षण रद्द करण्यात आल्यामुळे नव्याने सोडत काढण्यात आली.यासाठी उपविभागीय अधिकारी डाॅ. मंजुषा लटपटे यांना प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तहसीलदार नरसिंग जाधव, गटविकास अधिकारी संतोष वंगवाडे, नायब तहसीलदार संतोष धारशिवकर, शैलेश निकम यांची उपस्थिती होती..अनुसुचित जाती -हाडोळी, अंबुलगा, गांजूरवाडी, ब्रम्हवाडी (ये), केंद्रेवाडी, राचन्नावाडी, हणमंतजवळगा,अनुसुचित जाती महिला -मोहदळ, हिंपळनेर, रामवा़डी, आष्टा, ब्रम्हवाडी (व), नागदरवाडी, लिंबाळवाडीअनुसुचित जमाती -बोळेगाव (खु),.अनुसुचित जमाती महिला -कलकोटीनागरिकांचा मागास प्रवर्ग -भाटसांगवी, झरी (खु), कडमुळी, कबनसांगवी, अजनसोंडा (खु), टाकळगाव, घरणी, रोहिणा, कवठाळी,नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला -महांडोळ, शिवणीमंजरा, शिरनाळ, लातूररोड, महाळंगी, बावलगाव, आटोळा, जानवळ, अजनसोंडा (बु), बोरगाव (बु),.सर्वसाधारण -अलगरवाडी, मांडुरकी, शेळगाव, तिवघाळ, वडगाव एक्की, झरी (बु), दापक्याळ, घारोळा, जगळपुर, मोहनाळ, बनसावरगाव, रायवाडी, सुगाव, तिवटघाळ, उजळंब, हाळी खुर्द, नायगाव, शिवणखेड (बु)सर्वसाधारण महिला -आनंदवाडी, बेलगाव, बोथी, चापोली, देवंग्रा, डोंग्रज, गांजूर, जढाळा, महाळंग्रा, मष्णेरवाडी, मुरंबी, नळेगाव, तिर्थवाडी, वाघोली, नांदगाव, वडवळ नागनाथ, महाळंग्रावाडी, नागेशवाडी.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.