esakal | Womens day-  आठ मार्च रोजी अक्षरोदय साहित्य संमेलन
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मंडळाकडून जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी (ता. आठ) मार्च रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहावाजेपर्यंत येथील नरहर कुरुंदकर सभागृह पीपल्स कॉलेज याठिकाणी साहित्य संमेलन घेण्यात येत आहे.

Womens day-  आठ मार्च रोजी अक्षरोदय साहित्य संमेलन

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : येथील लोकप्रिय असलेली व सतत कार्यरत असलेली साहित्य संस्था म्हणून नावारूपाला आलेली एकमेव साहित्य संस्था अक्षरोदय साहित्य मंडळ महाराष्ट्र मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्र राज्यात कार्यान्वित आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मंडळाकडून जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी (ता. आठ) मार्च रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहावाजेपर्यंत येथील नरहर कुरुंदकर सभागृह पीपल्स कॉलेज याठिकाणी साहित्य संमेलन घेण्यात येत आहे.

संमेलनाची सुरुवात ग्रंथ प्रभात फेरी महात्मा फुले यांच्या पुतळ्याला वंदन करून पीपल्स कॉलेज संमेलनाच्या ठिकाणी जाईल. संमेलनास सुरुवात होईल या संमेलनाच्या नगरीचे नाव प्रमोद दिवेकर ठेवण्यात आलेला असून कवित्री पूजा मेटे प्रवेशद्वार व विद्या बाळ विचारपीठ ठेवण्यात आलेली आहे. साहित्य संमेलनासाठी उद्घाटक म्हणून माननीय प्राध्यापक जगदीश कदम हे राहणार असून संमेलनाच्या अध्यक्षपदी प्राध्यापक संध्या रंगारी भूषवणार आहेत. तर प्रमुख उपस्थिती म्हणून नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर व देविदास फुलारी हे राहणार आहेत.

हेही वाचाअर्थसंकल्प : औंढा नागनाथ, नरसी नामदेव तीर्थक्षेत्रासाठी मिळणार निधी

महिला गौरव पुरस्कार, साहित्य पुरस्कार
 
या संमेलनाचे प्रमुख पाहुणे प्रा. महेश मोरे असून विशेष निमंत्रित म्हणून या संमेलनामध्ये डॉ. मुकुंदराज पाटील व विमल शेंडे या उपस्थित राहणार आहेत. या साहित्य संमेलनामध्ये महिला गौरव पुरस्कार साहित्य पुरस्कार परिसंवाद कथाकथन कवी संमेलन व समारोपीय सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांवर होणारे अत्याचार कारणे व उपाय या विषयावर परिसंवाद घेण्यात येणार आहे. या परिसंवादाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी हे राहणार असून सहभाग मध्ये डॉ. संगीता अवचार, मारुती मुंडे, रत्नमाला व्यवहारे हे राहणार आहेत.

कथाकथन घेण्यात येणार आहे

पुढील सत्रामध्ये कथाकथन घेण्यात येणार आहे कथाकथन या सत्राचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक बालाजी पेटेकर हे राहणार असून सहभाग मध्ये राम तरटे, स्वाती कानेगावकर, शंकर पाटील यांचा सहभाग राहणार आहे. या संमेलनाचे उद्घाटकीय सूत्रसंचालन शरद चंद्र हे करणारा असून प्रास्ताविक सदानंद सपकाळे हे करणार आहेत.