esakal | रेल्वे मार्ग विद्युतीकरणाच्या कामाने घेतला वेग, कुठे ते वाचा...  
sakal

बोलून बातमी शोधा

railway

अकोला ते पूर्णा रेल्‍वे मार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामासाठी मागच्या काही दिवसांपासून हिंगोली रेल्‍वेस्‍थानकावर त्‍यासाठी लागणारे खांब आले आहेत. खांबे उभारणीचे काम सध्या जोरात सुरू झाले आहे.

रेल्वे मार्ग विद्युतीकरणाच्या कामाने घेतला वेग, कुठे ते वाचा...  

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली ः अकोला ते पूर्णा रेल्‍वे मार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामासाठी मागच्या काही दिवसांपासून हिंगोली रेल्‍वेस्‍थानकावर त्‍यासाठी लागणारे खांब आले आहेत. त्‍याची उभारणीदेखील लवकरच केली जाणार आहे. आता काही दिवसांनंंतर या मार्गावरून धावणारे डिझेल इंजिन बंद होऊन इलेक्‍ट्रिक इंजिन धावणार असल्याचे संकेत आहेत.

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय रेल्‍वे मंडळ कार्यालयांतर्गत येणाऱ्या पूर्णा ते अकोला या २१० किलोमीटर लांबीच्या रेल्‍वे मार्ग विद्युतीकरणाच्या कामास प्रत्‍यक्षात सुरवात झाली. रेल्‍वे मार्गाच्या विद्युतीकरणासाठी अकोला ते पूर्णा रेल्‍वे मार्गाच्या २१० किलोमीटरवर विद्युत खांब उभे केले जात आहेत. अकोला ते शिवणी शिवापूर मार्गापर्यंत जागोजागी विद्युत खांब उभारले आहेत.

हेही वाचा - हिंगोलीकर आनंदीत, कोरोना रुग्ण बरे होण्याचा ‘रिकव्हरी रेट’ राज्यात तिसरा 

रेल्वे विभागाकडून तातडीने काम सुरू
लॉकडाउनच्या तीन महिन्याच्या कालावधीत रेल्वे विभागाने तातडीने हे काम सुरू केले आहे. हे काम २०२१ पर्यंत पूर्ण होणार असल्याचे रेल्‍वे प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे. त्‍यामुळे आता काही दिवसांनंतर या मार्गावरून डिझेल इंजिनऐवजी आता नव्याने इलेक्‍ट्रिक इंजिन धावणार आहे. विद्युतीकरणाचे काम सेंट्रल आर्गनाईजेशन फॉर रेल्वे इलेक्ट्रिफिकेशन अलाहाबाद हे करीत आहेत. ज्या कंपनीकडे हे काम सोपविण्यात आले, त्या कंपनीला तीन वर्षांत हे काम पूर्ण करणे बंधनकारक आहे. या कंपनीने अनेक कामे घेतली असून ती कामे त्‍यांनी एक वर्षअगोदर पूर्ण केले आहे.


हेही वाचा - बांबूची शेती ठरेल फायदेशीर, कोण म्हणाले ते वाचा...

सर्वेक्षण करण्याचे काम सुरू
या मार्गाच्या इलेक्ट्रिफिकेशनसाठी लागणारे सामान या मार्गावर असलेल्या विविध रेल्‍वे स्‍थानकावर रेल्‍वे प्रशासनातर्फे जमा केले जात आहे. हा मार्ग अकोल्यापासून दक्षिण ते उत्तर भारताला जोडणारा मार्ग आहे. यामुळे या मार्गावरून अनेक रेल्‍वे हैदराबाद ते नांदेड, पूर्णा ते अकोला दरम्‍यान डिझल इंजनाचा उपयोग करून अकोला येथील डिजल इंजिन काढून इलेक्ट्रिक इंजन लावले जात होते. कारण अकोल्यापासून पुढे सर्वच मार्गाचे विद्युतीकरण झाले आहे. नांदेड विभागामध्ये पूर्णा ते अकोला हा २१० किलोमीटरचा मार्गावरच डिझल इंजिनाचा उपयोग होतो. फेब्रुवारी २०१८ मध्ये रेल्‍वे बजेटच्या पिंक बुकमध्ये अकोला-पूर्णा रेल्वे मार्गाचे विद्युतीकरणाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्‍यासाठी २११ करोड रुपयांचा निधी देण्याचे केंद्रीय रेल्‍वे मंत्रालयाने जाहीर केले होते. त्‍याप्रमाणे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू झाले होते.

विद्युतीकरणासाठी निविदी जारी
रेल्‍वे विभागाने पूर्णा ते अकोला या २१० किलोमीटरचे विद्युतीकरणासाठी निविदी जारी केली. त्‍यांनतर हे काम केईसी कंपनीला देण्यात आले. या कंपनीचे अभियंता, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी इलेक्ट्रिफिकेशनचे काम सुरू केले आहे. हा मार्ग उत्तर भारत ते दक्षिण भारत जोडणारा मार्ग आहे. ईटारसी-अकोला-नांदेड-हैदराबाद मार्ग जोडण्यात येणार असल्याने व्यापाऱ्यांसाठी तो सोयीचे होणार आहे. अकोल्यापासून पुढे रेल्‍वे मार्गाचे विद्युतीकरण झालेले आहे. डिझल इंजिन काढून इलेक्ट्रिक इंजन बदलण्यासाठी दररोज अर्धा तास लागतो. अकोला ते पूर्णावरील डिजल इंजन बंद करण्यात आल्यावर खर्चातदेखील बचत होणार आहे. दरम्‍यान, आता लवकरच पूर्णा ते अकोला या रेल्‍वे मार्गाचे विद्युतीकरण होऊन या मार्गावरून इलेक्‍ट्रिक इंजिन धावणार असल्याचे संकेत आहेत. 

loading image
go to top