esakal | हिंगोली बसस्थानकाचे काम संथगतीने, प्रवाशांची होते गैरसोय
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

येथील नूतन बसस्थानकाचे भूमिपूजन तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते एक वर्षांपूर्वी करण्यात आले होते.

हिंगोली बसस्थानकाचे काम संथगतीने, प्रवाशांची होते गैरसोय

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : येथील बसस्थानकाचे काम मागील एक वर्षापासून गुत्तेदाराकडून संथगतीने सुरु असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. याकडे मात्र आगार प्रमुखांचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांची मात्र गैरसोय होत आहे.

येथील नूतन बसस्थानकाचे भूमिपूजन तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते एक वर्षांपूर्वी करण्यात आले होते. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून प्रशस्त बसस्थानक उभारणीचे काम गुत्तेदारकडे सोपविण्यात आले. काम सुरु कारण्यापासून गुत्तेदार व राजकीय पुढाऱ्यात एकमत होत नसल्याने बरेच दिवस काम रेंगाळले होते. कामाचा नकाशा एक आणि दुसरेच त्यांनी केले अशी चर्चा होत आहे.

कोरोना प्रादुर्भाव असल्याने गेली सहा महिने कामकाज बंद होते. शिवाय गुत्तेदाराकडे निधी उपलब्ध नसल्याने मजुरांना मजुरी कशी द्यावी असा प्रश्न पडल्याने त्यांनी काम बंद पाडले होते. अद्यापही काम संथगतीने सुरु आहे. याकडे मात्र आगार प्रमुखांचे साफ दुर्लक्ष होत आहे.

हेही वाचा - शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज : रब्बी हंगामासाठी निम्म मानार प्रकल्पातून 25 नोव्हेंबरला पहिली पाणीपाळी -

येथील पर्यायी बसस्थानकात तात्पुरते शेड उभारण्यात आले. या ठिकाणी बसेस येताच धूळ उडत असल्याने प्रवाश्याना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे बसस्थानक आहे की क्रीडांगण आहे असे प्रवाशी सांगत आहेत. या प्रकारामुळे प्रवासी ही वैतागले असून, तक्रार कोणाकडे करायची असा प्रश्न प्रवाश्याना पडला आहे. शनिवारी बसस्थानकात केवळ धुळीचे लोट उधळत होते. या ठिकाणी गिट्टी उडून लागण्याची भीती प्रवाश्याना आहे. त्यामुळे सावधगिरीने प्रवासी बस येताच आत मध्ये प्रवास बसत आहेत. 

बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने प्रवासी संतापले आहेत. तर धूळ उडत असल्याने कुठे बसावे असा प्रश्न पडत आहे. तिकिटांची किंमत मोजून ही बसस्थानक आगार व्यवस्थापकडून व्यवस्था होत नसल्याची नाराजी प्रवाशी व्यक्त केली.तर चालक वाहकांच्या रूमची देखील दुरावस्था आहे.  बसस्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र आहे. त्यामुळे येथे सुरू असलेले बसस्थानकाचे काम तातडीने करू प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे. 

प्रकाश काळे : येथे तात्पुरते उभारण्यात आलेल्या शेड मध्ये कोणत्याच सुविधा नाहीत पिण्याचे पाणी मिळत नसल्याने विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. नवीन बसस्थानकाचे संथगतीने होत असलेले काम तातडीने करणे गरजेचे झाले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image
go to top