esakal | परभणीत 24 ×7 कोरोना वॉररुम कार्यरत; 40 अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या

बोलून बातमी शोधा

parbhani covid
परभणीत 24 ×7 कोरोना वॉररुम कार्यरत; 40 अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या
sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः कोरोना संसर्गाच्या आपत्तीमध्ये अतिमहत्वाच्या निरोपाचे काम असो किंवा त्या अनुशंगाने प्राप्त झालेल्या तक्रारीचा तातडीने निपटारा करणे असो यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात 24 × 7 साठी वॉररुम कार्यान्वित करण्यात आली आहे. या वॉररुममध्ये 40 अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. त्याद्वारे समस्या सोडविण्याचे काम केले जाणार आहे.

परभणी जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रेमडेसिव्हिर इंजेक्शनची मागणी वाढत आहे. सदर इंजेक्शन औषधी दुकानदार यांच्याकडून जास्त दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे येत आहेत. तसेच कृत्रिम तुटवडा निर्माण केल्याच्या देखील तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. कोरोना प्रादुर्भाव काळात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा पुरवठा व वितरण सुरुळीत होण्याच्या दृष्टीने व कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या उपलब्धतेबाबत कोविड कामकाजाची सर्व प्रकारची माहिती जनतेला मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना वॉररुम तयार करण्यात आले आहे. या वॉररुममध्ये 24× 7 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा - परभणी : रेमडेसिविर इंजेक्शन विकणाऱ्या परिचारिकेसह एकास अटक

यावर होणार वॉररुममध्ये काम

परभणी जिल्ह्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा पुरवठा व वितरण आणि कोविड 19च्या कामकाजाची सर्व प्रकारची माहिती जनतेला मिळण्यासाठी व त्या अनुषंगाने प्राप्त तक्रारीचे निराकरण करण्यासाठी ही वॉररुम स्थापन करण्यात आली आहे. त्यामध्ये कोरोना विषाणू संसर्गाबाबत प्राप्त झालेले अतिमहत्वाचे संदेश, माहिती किंवा तक्रारीची नोंद घेवून संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देण्यासाठी 40 अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. दिवसाच्या 12 तासासाठी एक व रात्रीच्या बारातासासाठी एक अस्या पध्दतीने हे पुढील 40 दिवसांचे नियोजन लावण्यात आले आहे.

"कोविड वॉररुममधील दुरध्वनीवर प्राप्त होणारे सर्व संदेश स्विकारणे, त्यांची तात्काळ नोंदवहीत नोंद घेणे, विषाणु संसर्ग प्रादुर्भाव संदर्भात अतिमहत्वाचे संदेश, माहिती प्राप्त होताच संपर्क अधिकारी म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे देण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत."

- दीपक मुगळीकर, जिल्हाधिकारी

संपादन- प्रल्हाद कांबळे