ड्रोनसह 56 कॅमेऱ्यांत पोलिस भरतीची लेखी परीक्षा

उमेश वाघमारे
गुरुवार, 5 एप्रिल 2018

पोलिस भरती लेखी परीक्षाही एक ड्रोन कॅमेरा, 40 सीसीटीव्ही आणि 25 व्हिडिओ कॅमेरे अशा एकूण 56 कॅमेरांव्दारे नजर ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधिक्षक रामनाथ पोकळे यांनी गुरुवारी (ता. 5) 'सकाळ'शी बोलताना दिली आहे.

जालना - जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी (ता. 6) घेण्यात येणाऱ्या पोलिस भरती लेखी परीक्षाही एक ड्रोन कॅमेरा, 40 सीसीटीव्ही आणि 25 व्हिडिओ कॅमेरे अशा एकूण 56 कॅमेरांव्दारे नजर ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधिक्षक रामनाथ पोकळे यांनी गुरुवारी (ता. 5) 'सकाळ'शी बोलताना दिली आहे. तसेच परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी उमेदवारांची अत्याधुनिक मशीनव्दारे तपासणी केली जाणार असल्याचे ही पोलिस अधिक्षक श्री. पोकळे यांनी सांगितले आहे.

जालना पोलिस प्रशासनाच्या 50 जागांसाठी नऊ हजार 839 उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरले होते. त्यापैकी सहा हजार 901 उमेदवारांची ता.12 मार्च ते 22 मार्च मैदानी चाचणी परपडली होती. त्यानंतर प्रवर्ग निहाय मैदानी चाचणीच्या गुणाच्या आधारे 15 उमेदवार याप्रमाणे 6 हजार 226 उमेदवार लेखी परीक्षेसाठी पत्र ठरले आहेत. या उमेदवारांची शुक्रवारी (ता. 6) पहाटे 5 वाजता लेखी परीक्षेची प्रक्रिया सुरु होणार आहे. या परीक्षेसाठी 4k व्हिडिओ रेकॉर्डिंगचा एक ड्रोन कॅमेरा व 40 सीसीटीव्ही आणि 15 व्हिडिओ शूटिंगचे कॅमेऱ्यांव्दारे रिकॉर्डिंग होणार आहे. तसेच परीक्षेमध्ये कोणताही गैर प्रकार होऊ नये यासाठी  बायोमेट्रिक हजेरी, आयरीस डिटेक्टर, डोरफ्रेम मेटल डिटेक्टर, हाँडी हेल्ड मेटल डिटेक्टर, नॉन लीनियर जंगशन डिटेक्टर या अत्याधुनिक यंत्रानी उमेदवारांची तपासणी होणार असल्याची माहितीही पोलिस अधिक्षक रामनाथ पोकळे यांनी दिली आहे.

तर थेट कारवाई
पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेदरम्यान उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचे आढळून आल्यास त्यांच्या थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Written test for police recruitment with 56 cameras and drones