Beed Crime: यश ढाका खून प्रकरणात तिघे अटकेत; कुटूंबियांनी घेतली एसपींची भेट
Yash Dhaka Murder Case Police Nab Third Accused Krishna Sonawane in Beed: भर रस्त्यात यश ढाका याचा खून करुन मारेकरी फरार झाले होते. या प्रकरणाचा पोलिस कसून तपास करीत आहेत.
बीड: पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा यश ढाका खून प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ता. २५ रोजी रात्री माने कॉम्प्लेक्स भागात यश ढाका याचा चाकूने भोसकून खून करण्यात आला होता.