
Dharashiv News
sakal
येरमाळा : धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पिंपळगाव येथील तुळजाई कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी बंद केल्यानंतर चोराखळी येथील महाकाली कला केंद्र नियमांचा भंग केल्याने व कायदा सुव्यवस्था बिघडल्याने परवाना कायमस्वरूपी रद्द करावा असा प्रस्ताव पोलिस अधीक्षक रितु खोखर यांनी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडे पाठवला आहे.