​साठवलेल्या पावसाच्या पाण्याचा वर्षभर वापर

photo
photo

सेनगाव (जि. हिंगोली): निसर्गाने मानवाला भरभरून दिले. त्या बदल्यात मानवाने निसर्गावर अन्याय केला. परिणामी पर्जन्यमानात घट झाली. पाणी पातळी खालावली. शुद्ध पाण्याअभावी आजारांना आमंत्रण मिळते. मात्र मागील पाच वर्षांपासून येथील संघई कुटुंबीय पावसाळ्यातील पाणी साठवून ठेवतात. याच पाण्याचा वापर ते वर्षभर पिण्यासाठी करतात.

शहरातील सेवानिवृत्त शिक्षक रूपचंद संघई व त्यांच्या पत्नी शैला रूपचंद संघई हे जैन कुटुंबीय राहतात. त्यांच्या कुटुंबात एकूण अकरा सदस्य आहेत. २०१५ साली शहरात १०८ श्री नियम सागरजी महाराज आले होते. त्यांनी पावसाळ्यातील स्वाती नक्षत्रात पडणारे पाणी साठवून त्याचा नियमित वापर केल्यास आरोग्याला किती फायदेशीर आहे या बाबत समाज प्रबोधन केले होते. श्री संघई दाम्पत्याने पावसाळ्यातील पाणी साठवून त्याचा वापर करण्यासाठी प्रारंभ केला. 

सात हजार लिटर पावसाळी पाणी

सुरवातीला अनेक अडचणी आल्या. मात्र, दृढ संकल्प केल्यामुळे त्यावर सहज मात केली. त्यांच्याकडे आज घडीला सात हजार लिटर पावसाळी साठवून ठेवलेले पाणी आहे. त्याचा नियमित वापर स्वयंपाक व पिण्यासाठी केला जातो. निसर्गाने मानवाला भरभरून दिले. त्याबदल्यात मानवाने निसर्गावर सातत्याने अन्याय केला. बेसुमार वृक्षतोड झाली. त्यामुळे कमी पर्जन्यमान, अतिवृष्टी, निसर्गाचा लहरीपणा यासह अनेक समस्या उद्‍भवत आहेत. परिणामी जमिनीतील पाणी पतळी सातत्याने खालावत चालली आहे. जल हे जीवन असून मानवी जीवनात पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशुद्ध पाणी पिण्यात आल्याने अनेक आरोग्याच्या तक्रारी उद्‍भवतात.

कॅन व हौदामध्ये साठवणूक

 दरम्यान, पावसाळ्यातील स्वाती नक्षत्रातील पाणी शिंपल्यात पडले तर त्याचे रूपांतर मोत्यात होते. शिवाय नैसर्गिक शुद्ध पाणी वापरामुळे शरीराला अत्यावश्‍यक विविध खनिजे मिळतात. धावपळीच्या व स्पर्धेच्या युगात मिळेल ते पाणी देण्यात आल्याने आरोग्य सुदृढ राहत नाही. मात्र अनंत अडचणींवर मात करून संघई दाम्पत्य दैनंदिन वापरात पावसाळी साठवून ठेवलेले पाणी नियमित वापरतात. पावसाळ्यात पडणारे पाणी पाईपने कॅन व हौदामध्ये साठवणूक केली जाते. 

उकळून पाण्याचा वापरात

वातावरण व सूर्यकिरणांचा संपर्क होणार नाही. याची काळजी घेतली जाते. अनेक महिने हे पाणी शुद्ध राहते. हौदामध्ये पिशवीत चुना भरून ती पाण्यात लटकून ठेवल्यामुळे कोणतेच जीवजंतू होत नाहीत. दैनंदिन वापरात उकळून व गरम करून ते आणले जाते. जैन धर्मीयांमध्ये मुनीपद धारण करण्यासाठी विविध अकरा प्रतिमांचे पालन करावे लागते. २०१६ पासून रूपचंद संघई यांनी दर्शन, व्रत, समाईक, प्रवषोधोपवार अशा चार प्रतिमांचे पालन केले असून त्यांची सचित त्याग ही पाचवी प्रतिमाचे पालन सुरू आहे. पावसाळी शुद्ध पाणी दैनंदिन वापरल्याने आरोग्याच्या कोणत्याही तक्रारी उद्‍भवत नसल्याचे संघई कुटुंबीयांनी सांगितले आहे.

अमृत समान पाणी

अशुद्ध पाणी पिण्यात येत असल्याने अनेक छोट्या-मोठ्या आरोग्याच्या तक्रारी उद्‍भवतात. मागील पाच वर्षांत मी व माझी पत्नी स्वाती नक्षत्रातील पावसाळ्यातील अमृत समान पाणी पितो. आमच्या कुटुंबाकडे आज घडीला पावसाळ्यातील सात हजार लिटर पाणी साठवून ठेवलेले आहे.
-रूपचंद संघई

 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com