esakal | Parbhani Rain: येलदरी ९५ टक्क्यांवर; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

येलदरी धरण

पाच तारखेला ९०.८५ टक्के असलेला पाणीसाठा मंगळवारी सकाळी (९५.८१ टक्के) ९६ टाक्याच्या घरात पोचला आहे

Parbhani Rain: येलदरी ९५ टक्क्यांवर; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

sakal_logo
By
राजाभाऊ नगरकर

जिंतूर (परभणी): मंगळवारी (ता.७) सकाळी सहाच्या सुमारास तालुक्यातील येलदरी धरणातील पाणीसाठा ९५.८१ टक्यावर पोचला. धरणाच्या जलाशयात सतत पाण्याची आवक सुरू असल्याने धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर असल्याने कोणत्याही क्षणी धरणातून विसर्ग सोडला जाण्याची शक्यता आहे. गेल्या पाचसहा दिवसापांसून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. उर्ध्व भागात बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पातून चार दिवसांपासून नदीपात्रात सोडण्यात येत असलेला एक हजार विसर्ग सोमवारी (ता.६) संध्याकाळी सहा हजार ५६३ क्युसेक्सपर्यंत वाढवण्यात आला. यामुळे येलदरी धरणाच्या पाणीपातळीत रोज मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे पाच तारखेला ९०.८५ टक्के असलेला पाणीसाठा मंगळवारी सकाळी (९५.८१ टक्के) ९६ टाक्याच्या घरात पोचला आहे.

येत्या दोन-तीन दिवसांत धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. येथील विद्युत निर्मिती प्रकल्पाद्वारे अथवा काही प्रमाणात मुख्य दरवाजे उघडून पूरनियंत्रण कक्षातर्फे पूर्णानदी पात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्याची शक्यता आहे. गतवर्षी ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विसर्ग सोडण्यात आला होता. धरणाची एकूण पाणीसाठवण क्षमता ९३४.७४० दशलक्ष घनमीटर असून मंगळवारी (ता.७) सकाळी सहापर्यंत धरणात ९००.५८० दशलक्ष पाणीसाठा उपलब्ध होता. तर जीवंत पाणीसाठा ७७५.९०४ दशलक्ष घनमीटर असून ज्याची ९५.८१ टक्केवारी आहे. धरणात मागील चोवीस तासात २०.५०४ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली ती अजूनही सुरूच आहे.

हेही वाचा: Hingoli Rain: औंढा तलाव ओव्हरफ्लो, परिसरातील शेतकरी सुखावले

धरणाच्या पाणीपातळीत सतत वाढ होत असल्याने धरणातून नदीपात्रात केंव्हाही विसर्ग सोडण्याची शक्यता असल्याने पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे नदीकाठच्या गावातील ग्रामस्थ, शेतकरी यांना येलदरी धरण पूरनियंत्रण कक्ष व महसूल प्रशासनाने अनेकवेळा सावधानतेचा इशारा दिला आहे. इशारा देऊनही अनेकांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने नदीकाठच्या परिसरात विद्युत मोटारीकाढून घेतलेल्या दिसत नसल्याने त्या त्वरित काढून घेण्यासाठी पूरनियंत्रण कक्षातर्फे आज (ता.७) सकाळी पुन्हा इशारा देण्यात आला.

loading image
go to top