

Samadhan Barakul in Yeramala farm showcasing G-9 bananas ready for export to Iraq.
Sakal
येरमाळा : शेतीत आधुनिक तंत्रज्ञान,योग्य नियोजन आणि निर्यातक्षम वाणाची निवड केल्यास कमी क्षेत्रातूनही भरघोस उत्पन्न मिळू शकते,हे येथील प्रगतशील समाधान तानाजी बारकुल या शेतकऱ्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.जानेवारी २०२५ मध्ये लागवड केलेल्या जी-९ वाणाच्या केळी पिकातून थेट इराक देशात निर्यात करत तब्बल ७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.