
Yermala Crime
Sakal
येरमाळा : धाराशिव जिल्ह्यातुन गेलेल्या सोलापुर धुळे राष्ट्रीय महामार्गावर तेरखेडा परिसरात चालत्या ट्रकवर चढून माल चोरी करणाऱ्या टोळीचा व्हिडिओ सोमवारी (ता.आठ) सोशल मीडियात व्हायरल झाला होता.या घटनेचा माग काढत असतानाच धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने या आरोपींचा माग काढताना मिळालेल्या गोपनीय खबरीवरुन की,ट्रक चोरीतील व्हायरल व्हिडीओतील दोन आरोपीसह इतर चौघांना येडेश्वरी देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची गाडी अडवून त्यांना लुटण्याच्या तयारीत असताना मलकापूर शिवारातून अटक केली असली तरी महामार्ग लुटीवर आळा घालण्यात जिल्हा पोलिस प्रशासनाला यश येईल का असा सवाल वाहनधारक,स्थानिकातून केला जात आहे.