येस बॅंक : परभणीतील ‘या’ बॅंकांचे व्यवहार गडगडले !

file photo
file photo
Updated on

परभणी : येस बॅंकेवर आलेल्या निर्बंधामुळे परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे ऑनलाईन व्यवहार गडगडले आहेत. जिल्हा बॅंकेसह जिल्ह्यातील इतर दोन बॅंकाचे व्यवहार देखील याचा विपरित परिणाम झालेला आहे. जिल्हा बॅंकेचे सर्व ऑनलाईन व्यवहार बंद असल्याने बॅंकेच्या जवळपास सर्वच शाखाच्या कॉऊंटरवर ग्राहकांची मोठी गर्दी दिसून आली.

ढासळत्या आर्थिक स्थितीमुळे रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे खातेधारकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. बँकेच्या ग्राहकांना महिन्याभरासाठी आपल्या खात्यातून फक्त ५० हजार रुपयांपर्यंतच रक्कम काढता येणार आहे. येस बॅंकेवर टाकलेल्या निर्बंधाचा विपरित परिणाम इतर बॅंकाच्या आर्थिक व्यवहारावरदेखील पहावयास मिळाला आहे. रिझर्व्ह बॅंकेने निर्बंध घातल्याने या बॅंकेत ठेवी ठेवणाऱ्या राज्यातील १०९ बॅंका अडचणीत आल्या आहेत. त्याच बरोबर राज्यातील या बॅंकाना येस बॅंकेचा कोड असल्याने या बॅंकाचे व्यवहार ढासाळले आहेत. 


येस बॅंकेचा ‘एमआयसीआर’ कोड
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला येस बॅंकेचा ‘एमआयसीआर’ कोड असल्याने या बॅंकेला देखील फटका बसला आहे. येस बॅंकेच्या निर्बंधामुळे परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे आरटीजीएस, एटीम व सीटीसी या सेवा बंद पडल्या आहेत. एटीएम व आरटीजीएस सेवा बंद असल्याने बॅंकेच्या सर्व शाखामध्ये पैसे काढण्यासाठी व भरण्यासाठी ग्राहकांची बॅंक काऊंटरला गर्दी झाली आहे.

ऑनलाईन सुविधा बंद
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध सरकारी योजना, विमा रक्कमा, कापसाचे पेमेंट केल्या जाते. परंतू आता ऑनलाईन सुविधा बंद झाल्याने या व्यवहारावर परिणाम दिसून आला आहे. तसेच जिल्ह्यातील बहुतांश शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पगार याच बॅंकेतून होत असल्याने त्यांना रोकड मिळविण्यासाठी बॅंकेच्या काऊंटरवर जाण्याची वेळ आली आहे.


दोन सहकारी बॅंकेचे क्लिअरन्सं बंद
येस बॅंकेच्या निर्बंधामुळे परभणी जिल्ह्यातील सहकारी क्षेत्रातील दोन बॅंकाच्या व्यवहारावर परिणाम झाला आहे. यात सुंदरलालजी सावजी अर्बन कॉ- ऑपरेटीव्ह बॅंक व अकोल कर्मर्शीयल बॅंकेचा यात समावेश आहे. या दोन्ही बॅंकाच्या क्लिअरन्सवर त्याचा परिणाम दिसून आला आहे. परंतू जिल्हा बॅंकेसह इतर दोन्ही सहकारी बॅंकेच्या इतर व्यवहारावर कुठलाही परिणाम नाही.


 रिझर्व्ह बॅंकेचा सल्ला मागविला
येस बॅंकेवर आलेल्या निर्बधामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या आरटीजीएस, एटीम व सीटीसी सेवांवर परिणाम झाला आहे. परंतू आम्ही रिझर्व्ह बॅंकेकडे पत्रव्यवहार केला असून त्यांचा सल्ला मागविला आहे.
- राजेंद्र मौजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, परभणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com