पाचोड - घरातील व्यक्ती कामांत व्यस्त असल्याचे पाहून अठरा महिन्याचा चिमुकला सर्वांची नजर चुकवून घराबाहेर खेळण्यासाठी बाहेर पडताच तो खेळण्याच्या नादात घराच्या मागील बाजूस असलेल्या शोषखड्यात पडून मरण पावल्याची हृदयद्रावक घटना पाचोड (ता. पैठण) येथील शिवाजीनगर भागात घडली असून तैमूर तश्कील मोमीन (वय १८ महिने) असे मयत चिमुकृल्याचे नाव आहे.