esakal | कर्ज कसे फिटणार या चिंतेतून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

तरुण शेतकरी विलास माने

कर्ज कसे फिटणार या चिंतेतून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

sakal_logo
By
भास्कर सोळंके

जातेगाव (जि.बीड) : आधीच (Beed) माथी सरकारी व खासगी कर्जाचा डोंगर. त्यातच अतिवृष्टीने खरिप पिके उद्ध्वस्त झाल्याने कर्ज कसे फिटणार याचीच चिंता सतावत असलेल्या एका तरुण शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या (Farmer Suicide) केल्याची घटना गुरुवारी (ता.नऊ) मारफळा येथे रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. विलास लक्ष्मण माने (वय २९, रा मारफळा, ता.गेवराई) (Gevrai) असे आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. दोन एकर शेतजमिनीत कुटुंबीयांची गुजराण होत नसल्याने विलास माने हे ऊसतोडीचेही काम करीत होते. त्यांच्यावर जातेगाव येथील बँकेचे व खासगी कर्ज आहे. यंदा त्यांच्या दोन एकर शेतजमिनीत कापूस (Cotton) व सोयाबीन (Soybean) पिक घेतले.

हेही वाचा: हिंगोलीत सोयाबीनला मिळाला ११ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव

परंतू मंगळवारी (ता.सात) झालेल्या पावसाने खरिप पिकाची पुरती वाताहत झाल्याने माथ्यावर सरकारी व खासगी कर्ज आणि वर्षभर कुटुंबीयाचा प्रंपच कसा होणार या विवंचनेत असलेल्या विलास यांनी गुरुवार (ता.९) रोजी घराच्या आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहीती तलवाडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे यांना मिळताच ते पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. रात्री मृतदेह गेवराई उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यास पाठविण्यात आला आहे. शुक्रवारी (ता.दहा) दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पाश्चात्य आई-वडील, एक भाऊ, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

loading image
go to top