Electric Shock : अंधानेर येथे विजेचा धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

वादळी पावसानंतर खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करत असताना, विजेचा तीव्र धक्का लागून एका ३५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.
suresh dapake

suresh dapake

sakal

Updated on

​कन्नड - तालुक्यामध्ये सोमवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसानंतर खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करत असताना, विजेचा तीव्र धक्का लागून एका ३५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. ही दुर्दैवी घटना अंधानेर येथे मंगळवारी (ता. २) दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. सुरेश विठोबा दापके (वय ३५, रा. अंधानेर, ता. कन्नड) असे मृत तरुणाचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com