Farming Accidentsakal
मराठवाडा
Farming Accident: कपाशीवर कीटकनाशक फवारणी करताना वीजेचा जबर धक्का बसून २५ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू
Jalna News: सोयगाव तालुक्यातील वेताळवाडी शिवारात कीटकनाशकाची फवारणी करताना वीज प्रवाह उतरल्याने २५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सोयगाव : कीटकनाशकाची फवारणी करताना शेतातील वीज पोलचा विद्युत प्रवाह उतरून पाय पडल्याने २५ वर्षीय युवा शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना वेताळवाडी शिवारात गुरुवारी (ता. २१) दुपारी एकच्या सुमारास घडली.