suryakant shep
sakal
केज - अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाल्याने हवालदिल झालेल्या तरूण शेतकऱ्याने राहत्या घरी विष प्राशन केल्याची घटना मंगळवारी (ता. २८) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास लाडेवडगाव येथे घडली. उपचारासाठी घेऊन जाताना वाटेत त्याचा मृत्यू झाला. सुर्यकांत व्यंकटी शेप (वय-४२) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.