
वसमत : वसमत तालुक्यातील परळी ते तपोवन मार्गावर भरधाव ट्रॅक्टरने धडक दिल्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी टॅकटर चालकाविरुध्द रविवारी ता.२९ पहाटे १० वाजता हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, सदर ट्रॅक्टर वाळू वाहतूक करणारे असल्याचा आरोप करीत चालकास अटक करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.