
माजलगाव : तालुक्यातील घळाटवाडी येथील युवा शेतकरी कृष्णा जिजाभाऊ पठाडे यांनी याच दिशेने एक अभिनव पाऊल टाकले आहे. त्यांनी ट्रॅक्टरला फवारणी यंत्राचा जुगाड जोडून एक आधुनिक फवारणी यंत्र तयार केले असून, या यंत्राच्या सहाय्याने अवघ्या एका तासात सात एकर क्षेत्रावर फवारणी करता येत आहे.