वाळू तस्करीच्या वादात तरुण शेतकऱ्याचा खून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020


वाळू वाहतूक करीत असताना त्यांना शिवाजी धोंडबाराव कदम (वय ३५) यांच्या शेतातील विद्युततार व पाणी अडचण ठरत असल्याने दोघांनी शिवाजी यांच्या सोबत तार काढण्यासाठी वाद निर्माण झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने शिवाजी कदम यांच्या गळ्यावर त्यांनी धारदार शस्त्राने वार केले. या वेळी त्यांचा जागीच मृत्यू झाला.

बरडशेवाळा (ता. हदगाव, जि. नांदेड) ः उचांडा (ता. हदगाव) येथे कयाधू नदीतील वाळूचा लिलाव झाला नसल्याने शासनाचा लाखो रुपये महसूल बुडत आहे; पण वाळू उपसा मात्र, महसूल व पोलिस प्रशासनाच्या आशीर्वादाने रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात होत आहे. यामध्ये वाळू वाहतूक करणारे मालक मात्र, आम्ही वरिष्ठांना धरून वाळू वाहतूक करीत असल्याचे सांगून मोठ्या प्रमाणात आर्थिक माया जमवत आहेत. याचा फटका तरुण शेतकरी शिवाजी धोंडबाराव कदम यांना बसला असून ते नाहक बळी ठरले.

सोमवारी (ता. १७) सकाळी नऊ वाजता नदीच्या काठावर त्र्यंबक प्रभाकर चव्हाण व रामदास प्रभाकर चव्हाण यांचे शेत असल्याने त्यांना वाळू वाहतूक करणारे मालक त्यांच्या शेतीतून ये-जा करण्यासाठी आर्थिक रक्कम देत असल्याचे कळते. वाळू वाहतूक करीत असताना त्यांना शिवाजी धोंडबाराव कदम (वय ३५) यांच्या शेतातील विद्युततार व पाणी अडचण ठरत असल्याने दोघांनी शिवाजी यांच्या सोबत तार काढण्यासाठी वाद निर्माण झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने शिवाजी कदम यांच्या गळ्यावर त्यांनी धारदार शस्त्राने वार केले. या वेळी त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा -  जनावरे चोरणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात
घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी यांनी घटस्थळी भेट दिली, तर मनाठा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मुंढे यांनी पंचनामा करून पुढील तपासाकरिता मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय हदगावकडे पाठविण्यात आला. सांयकाळपर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता. वाळू ये-जा करण्यासाठी विरोध केलेल्या तरुण शेतकऱ्याचा बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young farmer murdered over sand smuggling