esakal | पुलावरुन वाहन कोसळून भीषण अपघात, तरुणाचा जागीच मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

बीड जिल्ह्यातील केज-अंबाजोगाई रस्त्यावर अपघात. तरुण जागीच ठार

पुलावरुन वाहन कोसळून भीषण अपघात, तरुणाचा जागीच मृत्यू

sakal_logo
By
रामदास साबळे

केज (जि.बीड) : केजहून अंबाजोगाईकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्यावरील पुलावरून खाली कोसळून अपघात झाला. हा अपघात रविवार (ता.१८) पहाटेच्या सुमारास केज-अंबाजोगाई रस्त्यावरील चंदनसावरगावजवळ Beed घडला. या अपघातात मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव कृष्णा श्रीरंग सोनटक्के (वय ३५) असे आहे. धारूर शहरातील बाराभाई गल्लीतील तरुण कृष्णा सोनटक्के हा  धारूरहून केजमार्गे अंबाजोगाईकडे Ambajogai जात होता. तो एक किमी अंतरावर चंदनसावरगाव असताना त्यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन (एमएच-४४/जी-८३१३) पुलावरुन खाली कोसळल्याने भीषण अपघात झाला. रविवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातात कृष्णा सोनटक्के या तरूणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता, की यात वाहनाचे मोठे नुकसान होऊन दुरावस्था झाली आहे. youth died in accident on kaij-ambajogai road in beed district

हेही वाचा: मनसेने तोडले औरंगाबाद पालिका आयुक्तांच्या बंगल्याचे नळ कनेक्शन

अपघाताची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन ‌पंचनामा करून मृतदेह उच्चस्तरीय तपासणीसाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. या तरूणाच्या पार्थिवावर रविवारी दुपारी बारा वाजता धारूर शहरातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे नगरसेवक दत्तात्रय सोनटक्के यांनी सांगितले. तरूणाच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

loading image