esakal | मनसेने तोडले औरंगाबाद पालिका आयुक्तांच्या बंगल्याचे नळ कनेक्शन
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद - औरंगाबादचे महापालिका आयुक्तांच्या बंगल्याचे मनसेने तोडले नळ कनेक्शन.

मनसेने तोडले औरंगाबाद पालिका आयुक्तांच्या बंगल्याचे नळ कनेक्शन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शहरात (Aurangabad) पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) (Maharashtra Navnirman Sena) कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय (Aurangabad Municipal Corporation Commissioner Astik Kumar Pandey) यांच्या सरकारी बंगल्याचा पाणीपुरवठा बंद केला आहे. 'जलश्री' या शासकीय बंगल्याचे रविवारी (ता.१८) नळ कनेक्शन कापले. शहराच्या पाणी प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भुमिका घेतली आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आधी इशारा दिला होता. औरंगाबाद शहरात काही भागांत ५ दिवसाला, तर काही भागांत आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होतो आहे. शहराला आठवडाभरात किमान दोन वेळा पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नुकतीच केली होती. (maharashtra navnirman sena disconect aurangabad municipal commissioner water supply glp88)

हेही वाचा: जळगाव मनपात बंडखोर नगरसेवकांचा पून्हा भाजपला दे धक्का!

ही मागणी १० दिवसांत मान्य न झाल्यास महापालिका आयुक्तांच्या शासकीय बंगल्याचे नळ कनेक्शन तोडू असा इशारा जिल्हा संघटक बिपीन नाईक, वैभव मिटकर यांनी दिला होता. त्यानुसार रविवारी पहाटे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हे नळ कनेक्शन तोडले आहे.

loading image